मुंबई, 27 जून : कोणालाही लांब केसांची आवड असते. केसांची लांबी वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. केसांच्या वाढीसाठी आपण निरोगी आहार घेणे आणि आपल्या केसांची विशेष काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. शक्यतो केसांची केमिकलपासून संरक्षण करावे, जेणेकरून केसांची वाढ चांगली राहते. काही नैसर्गिक गोष्टींचा अवलंब केल्यास केसांची वाढ (Natural Ways To Grow Hair Faster) चांगली राहते.
आज आपण, रात्रीच्यावेळी केसांची काळजी घेण्यासाठी 3 उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय सतत काही दिवस केल्यास तुमचे केस वेगाने वाढू लागतील आणि केसांना पोषण आणि ताकद मिळेल. यासोबतच केसांच्या त्वचेचे रक्ताभिसरणही चांगले राहते. जाणून घेऊया केसांची वाढ चांगली राखण्यासाठी रात्रीच्या वेळी कोणते उपाय करावेत.
ऑर्गन ऑयल आणि गुलाब जल -
एका भांड्यात 3 चमचे गुलाबजल घ्या आणि त्यात 5 थेंब ऑर्गन तेल घाला. मिश्रण चांगले मिसळा. आता केसांच्या त्वचेला किमान 5 मिनिटे मसाज करा. काही वेळ केस मोकळे सोडा. सकाळी केस धुवा. यामुळे केस लांब तर होतीलच शिवाय केसांना चमकही येईल.
हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा
कोरफड जेल आणि खोबरेल तेल -
एका पातेल्यात 1 टेबलस्पून खोबरेल तेल घेऊन त्यात 1 मूठ कढीपत्ता घालून गरम करा. पाने चांगली भाजू लागल्यावर गॅस बंद करा आणि तेल थंड झाल्यावर गाळून घ्या. आता एका भांड्यात 2 चमचे कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात हे तेल मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून लांबपर्यंत लावा आणि रात्रभर केसांवर राहू द्या. सकाळी शॅम्पूने केस धुवा. आपण आठवड्यातून किमान 2 वेळा हा उपाय करू शकता.
हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या
कलौजी तेल आणि लिंबाचा रस -
एका वाडग्यात एक चमचा कलौजी तेल आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस मिसळा. आता त्यात 1 व्हिटॅमिन-ई ऑइल कॅप्सूल मिसळा. हे मिश्रण चांगले मिक्स करून केसांच्या त्वचेवर लावा आणि मसाज करा. रात्रभर केसांमध्ये राहू द्या. सकाळी केस धुवा. हा उपाय करून पाहिल्यास केस लवकर वाढतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health