जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चंद्रावर वापरता येईल असं टॉयलेट तयार करा आणि लाखो रुपये जिंका; NASA चं चॅलेंज

चंद्रावर वापरता येईल असं टॉयलेट तयार करा आणि लाखो रुपये जिंका; NASA चं चॅलेंज

चंद्रावर वापरता येईल असं टॉयलेट तयार करा आणि लाखो रुपये जिंका; NASA चं चॅलेंज

नासाने (NASA) Lunar Loo Challenges दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 28 जून : अंतराळात (SPACE) जाणं आता शक्य झालं असलं तरी अंतराळवीरांना (astronaut) आजही अनेक अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे मलमूत्र विसर्जन (Toilet). आपल्या दैनंदिन जीवनातील हा एक भाग. आजही अंतराळवीरांना स्पेसमध्ये आपलं हे दैनंदिन कार्य उरकरणं म्हणजे एक आव्हानच आहे. नासा त्यासाठी वेगवेगळी उपकरणं तयार करतच आहे, मात्र आता यामध्ये त्यांनी इतर शास्त्रज्ञ, इंजिनीअर्स आणि सर्वसामान्यांनाही सहभागी करून घेण्याचं ठरवलं आहे. 1975 साली जेव्हा अपोलो मिशन (Apollo missions) संपलं तेव्हा इंजिनीअर्सनी मलमूत्र विसर्जन हे अंतराळ प्रवासातील एक गंभीर आव्हान असल्याचं सांगितलं. नासाने यासाठी काही उपकरणं तयार केलीत. मात्र अद्यापही ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. आता नासा पुन्हा चंद्रावर जाण्याच्या तयारीत आहे. हे वाचा -  चला बॅग पॅक करा! अंतराळ पर्यटनाची तयार राहा, SPACE WALK ची सुवर्णसंधी 2024 ला नासाचं आर्टेमिस मिशन (Artemis Mission) आहे. ज्यामध्ये पुन्हा मानवाला चंद्रावर पाठवलं जाणार आहे. Artemis lunar landers मध्ये टॉयलेटची पडणार आहे. नासाने या समस्येवर तोडगा करण्यासाठी सामान्य व्यक्तींनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.  नासाने Lunar Loo Challenges दिलं आहे. ज्यामध्ये चंद्रावरही वापरता येईल असं टॉयलेट बनवण्याचं आव्हान दिलं आहे. चंद्रावर पृथ्वीप्रमाणे गुरुत्वाकर्षण नाही. त्यामुळे इथं वस्तू हवेत तरंगत ्सता आणि त्यामुळे चंद्रासाठी टॉयलेट बनवणं म्हणजे नासासाठी एक आव्हानच आहे. आतापर्यंत अंतराळ प्रवासी अडल्ड डायपर्स वापरत आले. शिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातही टॉयलेट आहेत. मात्र आता  फक्त सूक्ष्म गुरुत्वाकर्षण नाही तर चंद्रासारख्या कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणीही वापरता येईल असं टॉयलेट हवं आहे. हे टॉयलेट नेमकं कसं असावा याबाबत गाइडलाइन्सही जारी करण्यात आल्या आहेत. हे वाचा -  अंतराळवीर होण्याचं स्वप्न करा साकार! फक्त एका क्लिकवर अंतराळ स्थानकात पोहोचा सर्वोत्तम टॉयलेट डिझाइन करणारे एकूण तीन विजेते निवडले जातील. ज्यांना एकूण 26 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. फक्त मोठ्या व्यक्तीच नाही, अठरा वर्षांखालील मुलंही ज्युनिअर श्रेणी अंतर्गत या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nasa , Toilet
  • First Published :
जाहिरात
जाहिरात