मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चला बॅग पॅक करा! अंतराळ पर्यटनासाठी तयार राहा, SPACE WALK ची सुवर्णसंधी

चला बॅग पॅक करा! अंतराळ पर्यटनासाठी तयार राहा, SPACE WALK ची सुवर्णसंधी

रशिया (russia) तुम्हाला स्पेस वॉक (space walk) करण्याची संधी देत आहे.

रशिया (russia) तुम्हाला स्पेस वॉक (space walk) करण्याची संधी देत आहे.

रशिया (russia) तुम्हाला स्पेस वॉक (space walk) करण्याची संधी देत आहे.

मॉस्को, 26 जून : तुम्हाला अंतराळात जायचं आहे का? स्पेस वॉक (space walk) करायचा आहे का? मग लवकरच तुमचं हे स्वप्न साकार होणार आहे. रशियाच्या एनर्जिया स्पेस कॉर्पोरेशन (Energia space corporation) तुम्हाला अंतराळात घेऊन जाणार आहे. जिथं तुम्हाला SPACE WALK करायला मिळणार आहे.  अमेरिकेतल्या स्पेस अँडव्हेंचसह (Space Adventures) एनर्जियाने करार केला आहे. ज्यानुसार 2023 साली 2 अंतराळ पर्यटकांना (space tourists) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ((ISS)) स्पेस वॉकसाठी नेलं जाणार आहे.

एनर्जिया ही कंपनी रशियातील रोस्कोसमोर या अंतराळ संस्थेचा एक भाग आहे. एनर्जियाने सांगितलं की, आमच्या मोहिमेत सहभागी झालेल्या एकाला रशियाच्या सेगमेंटअंतर्गत एका प्रशिक्षित रशियन अंतराळयात्रीसह स्पेसवॉक करू दिलं जाईल.

हे वाचा - अंतराळवीर होण्याचं स्वप्न करा साकार! फक्त एका क्लिकवर अंतराळ स्थानकात पोहोचा

नासाने (NASA) खासगी मिशन्सना प्रोत्साहन देण्यासाठी रिचर्ज ब्रॅनसनच्या व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेस टुरिझ्म कंपनीशी करार केला. ही कंपनी अंतराळ यात्रींना अंतराळ पर्यटनासाठी पाठण्याच्या दिशेनं काम करते. हा करार झाल्याच्या दिवसांतच रशियाने टुरिस्ट स्पेस वॉकची घोषणा केली आहे.

एलन मस्क यांच्या स्पेस एक्सनेदेखील (SPACE X) मार्चमध्ये घोषणा केली होती की क्रू ड्रॅगनमार्फत पुढच्या वर्षी तीन जणांना स्पेस टुरिझ्मवर घेऊन जाणार.

हे वाचा - Lunar Eclipse 2020: 5 जुलैला होणार चंद्रग्रहण, कुठे दिसेल आणि कधी असेल सूतक काळ

तर स्पेस अँडव्हेंचर आपल्या वेबसाइटवर स्पेस टुरिझ्मबाबत सातत्याने जाहिरात करत आली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं की, जर तुम्ही रशियन सुयुज स्पेसक्राफ्टमार्फत अंतराळात उड्डाण भरणं पसंत कराल तर ही तुमच्यासाठी संधी आहे... एका प्रशिक्षित कॉस्मोनॉटसह तुम्ही स्पेसवॉक करू शकता, असं म्हटलं आहे.

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Space