लोगोमुळे महिलांचा अवमान होतो, अशी तक्रार दाखल झाल्यानंतर Myntra ने घेतला लोगो बदलण्याचा घेतला निर्णय

लोगोमुळे महिलांचा अवमान होतो, अशी तक्रार दाखल झाल्यानंतर Myntra ने घेतला लोगो बदलण्याचा घेतला निर्णय

ई-कॉमर्स वेबसाइट Myntra.com आता आपला लोगो बदलणार आहे. कारण त्यांचा सध्याचा लोगो आक्षेपार्ह आणि महिलांसाठी अपमानजनक असल्याचा दावा करत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी :  E Commers किंवा ऑनलाइन शॉपिंगचा प्रसिद्ध ब्रँड मिन्त्राच्या (Myntra)  लोगोविरोधात (Myntra Logo) तक्रार दाखल झाल्यानंतर कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपला लोगो बदलण्याचं ठरवले आहे. या लोगोमुळे महिलांचा अवमान होतो असा आक्षेप एका महिलेने दाखल केला होता. तिने या लोगोविरोधात मुंबई सायबर क्राईम पोलिसांकडे (Mumbai Cyber Crime Police) तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीनंतर कंपनीने आपला लोगा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण -

अवेस्ता फाऊंडेशन एनजीओच्या (Avesta Foundation NGO)मुंबईतील कार्यकर्त्या नाझ पटेल (Naaz Pate) यांनी डिसेंबर 2020 मध्ये राज्य सायबर पोलिसांकडे मिंत्राच्या लोगोविरोधात तक्रार दाखल केली होती. नाझ पटेल यांनी मिंत्राचा लोगो हटवण्याची मागणी करत जर कंपनीने सुचविलेल्या बदलांची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असं सांगितलं होतं. नाज पटेल यांनी सोशल मीडियावर याविरोधात आवाज उठवला. त्यांनी हे प्रकरण सोशल मीडियावरील (Social Media) अनेक प्लॅटफॉर्म आणि वेगवेगळ्या फोरमवर उलचून धरलं.

कंपनीने लोगो बदलण्यास दिली सहमती -

मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाच्या डीएसपी रश्मी करंदीकर यांनी जागरण या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'तपासा दरम्यान आम्हाला मिंत्राचा लोगो महिलांसाठी आक्षेपार्ह असल्याचं आढळले. तक्रारीनंतर ईमेलच्या माध्यमातून ई-कॉमर्स फर्म मिंत्राला संपर्क करण्यात आला. या विषयावरून झालेल्या वादानंतर आणि लोकांकडून प्रतिक्रिया मिळाल्यानंतर मिंत्राने लोगो बदलण्यास सहमती दर्शवली आहे.'

लोगो बदलण्यास मागितला एका महिन्याचा अवधी -

तसंच, कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली कंपनीच्या मॅनेजमेंटने आपला लोगो बदलण्यासाठी एका महिन्याचा अवधी मागितला असल्याचे रश्मी करंदीकर यांनी सांगितले. मिंत्रा सर्वच ठिकाणी आपला अधिकृत लोगोमध्ये बदल करणार आहे. मिंत्राने त्यांच्या वेबसाईट आणि अॅपवरील लोगो सुधारित करण्याची योजना आधीच आखली होती. तसंच, ते आपल्या जाहिरात आणि पॅकेजिंग वस्तूंवरील लोगो देखील बदलणार आहेत. पॅकेजिंग मटेरियलवर लोगो छापण्यासाठी पाठवण्यात आला आहे.

हे देखील वाचा -  ऑनलाइन डेटिंग नको रे बाबा! भारतीयांना आहे ही भीती, Macfee चा अहवाल

5 दिवसांत विकली 1.1 कोटी रुपयांची उत्पादनं -

कंपनीचा लोगो हा ती कंपनी आणि त्यांच्या ग्राहकांमधील संवादाचं माध्यम म्हणून कार्य करतो. तसंच ब्रँडिंगमध्ये देखील लोगो महत्वपूर्ण घटक आहे. पूर्वी अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत ज्यामध्ये ब्रँडला त्यांचा लोगो आणि प्रचार माध्यमांसाठी बॅकलॅशचा सामना करावा लागला आहे. मिंत्रा हे भारतामध्ये कपडे आणि इतर वस्तूंसाठीचे सर्वात मोठे ऑनलाईन विक्रेते आहे. फ्लिपकार्टच्या मालकीच्या या कंपनीने (Flipkart owned company) नुकताच आपल्या ‘End of Reason Sale’च्या नावाने प्रसिद्धी मिळवली. या साईटने केवळ 5 दिवसांमध्ये 1.1 कोटींची उत्पादनं विकली.

Published by: Aditya Thube
First published: January 30, 2021, 6:34 PM IST

ताज्या बातम्या