मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Women Safety Tools: घराबाहेर पडणाऱ्या महिलांकडे असायलाच हवेत हे सेफ्टी टूल्स

Women Safety Tools: घराबाहेर पडणाऱ्या महिलांकडे असायलाच हवेत हे सेफ्टी टूल्स

Safety Tools For Women: अलिकडे अनेक मुली रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करतात किंवा त्यांना रात्री उशिरा घरापासून दूर जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे काही आवश्यक सुरक्षा साधने असणे गरजेचे आहे.

Safety Tools For Women: अलिकडे अनेक मुली रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करतात किंवा त्यांना रात्री उशिरा घरापासून दूर जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे काही आवश्यक सुरक्षा साधने असणे गरजेचे आहे.

Safety Tools For Women: अलिकडे अनेक मुली रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करतात किंवा त्यांना रात्री उशिरा घरापासून दूर जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे काही आवश्यक सुरक्षा साधने असणे गरजेचे आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India

मुंबई, 16 सप्टेंबर : आपला समाज प्रगती करत आहे. कालपर्यंत अनेक कुटुंबात मुलीचा जन्म होणे देखील वाईट मानलं जात होतं तिथं आज मुलींना योग्य शिक्षण देऊन स्वावलंबी बनवलं जात आहे. आता मुली आणि महिला सक्षम होत आहेत आणि कामासाठी घराबाहेरही पडत आहेत. अनेक घरांमध्ये मुली संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतात. पण, आजही मुलींचे आई-वडील किंवा सासरचे लोक त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतात. कारण बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा महिलांवरील गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत असतात. यासाठी पोलीस, प्रशासन आणि शासनाकडून मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक प्रकारच्या मोहिमाही राबवल्या जातात, मात्र ही सर्व व्यवस्था असतानाही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात, त्यामुळे महिलांनी स्वत: सुरक्षेसाठी काही उपाय (Women Safety Tools) करायला हवेत, त्याविषयी जाणून घेऊया.

अलिकडे अनेक मुली रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करतात किंवा त्यांना रात्री उशिरा घरापासून दूर जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे काही आवश्यक सुरक्षा साधने असणे गरजेचे आहे. ज्याच्या मदतीने महिला गरज पडल्यास कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळू शकतात. आज आम्ही अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या वस्तू प्रत्येक मुलीने आपल्या जवळ किंवा बॅगेत ठेवणे आवश्यक आहे.

मुलींच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टी आवश्यक आहेत -

शॉक इफेक्ट सेफ्टी फ्लॅशलाइट -

शॉक इफेक्टसह रिचार्जेबल सेफ्टी फ्लॅशलाइट हे सर्व महिलांसाठी अतिशय उपयुक्त गॅझेट आहे. सुरक्षिततेसाठी महिला हे उपकरण त्यांच्या बॅगमध्ये ठेवू शकतात.

पेपर स्प्रे -

घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलीकडे आता पेपर स्प्रे असणे आवश्यक आहे. तुम्ही लहान आकाराचा स्प्रे कुठेही सोबत ठेवू शकता किंवा बॅगला किचन म्हणूनही वापरू शकता. हे लिपस्टिकच्या आकारा इतके किंवा मोठ्या आकारात देखील उपलब्ध आहे.

पेपर जेल -

हे पेपर स्प्रेसारखेच आहे परंतु त्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. ते लांबूनही वापरले जाऊ शकते.

हे वाचा - कॅन्सर, डायबेटिज रुग्णांना मोठा दिलासा; ही औषधं स्वस्त, इथं पाहा यादी

चाकू किंवा नेलकटर -

तुम्ही तुमच्यासोबत एक छोटा चाकू किंवा नेल कटर देखील ठेवू शकता. तुम्ही तुमच्यासोबत स्विस चाकू देखील ठेवू शकता.

सुरक्षा रॉड -

तुम्ही तुमच्या पर्समध्ये फोल्ड करण्यायोग्य सेफ्टी रॉड देखील ठेवू शकता. तो कॅरी करणे पण सोपे आहे आणि तो बॅगेत कमी जागेत देखील बसतो.

हे वाचा - प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, पोटाचा घेरही होईल कमी

मात्र, तुम्ही मेट्रोने प्रवास करत असाल तर यापैकी कोणत्या गोष्टी सोबत नेऊ शकता, याविषयी मेट्रोच्या मार्गदर्शक सूचना पहा.

First published:
top videos

    Tags: Safety, Safety of indian women