संंगीतप्रेमींचं आयुष्य अधिक निरोगी! शांत झोप ते तणाव कमी करण्यासाठी MUSIC ठरेल फायद्याचं

संंगीतप्रेमींचं आयुष्य अधिक निरोगी! शांत झोप ते तणाव कमी करण्यासाठी MUSIC ठरेल फायद्याचं

आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकजण कुठल्या ना कुठल्या तणावात (Stress) असतात. यामुळे हा तणाव कमी करण्यासाठी संगीत (Music) खूप महत्त्वाचे आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी: आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकजण कुठल्या ना कुठल्या तणावात (Stress) असतात. यामुळे हा तणाव कमी करण्यासाठी संगीत (Music) खूप महत्त्वाचे आहे. संगीत ऐकल्याने तुमच्या मनाला शांती मिळते. याचबरोबर शारीरिक थकवा देखील दूर होतो. यामुळे अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांचा संगीत हा आवडीचा विषय आहे. संगीताचा  आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनात (Research) समोर आलं आहे. आपलं आवडतं संगीत ऐकल की आपल्याला छान वाटत. आतून आपण फ्रेश आणि आनंदी असतो. तणाव कमी करण्यासाठी देखील संगीत खूप फायद्याचं ठरते. पण मूड फ्रेश करण्यासाठी त्याप्रकारच संगीत ऐकणे गरजेचं असते. यामुळे संगीत ऐकण्याचे फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार असून यामुळे तुमच्यावर याचा काय परिणाम होतो हे देखील तुम्हाला सांगणार आहोत.

तणाव कमी करण्यास मदत

तणाव कमी करण्यासाठी संगीत खूप फायदेशीर आहे. तुमच्या आवडीचे संगीत (Music) ऐकून तुम्ही हा तणाव दूर करू शकता. मनावरील ताण हलका झाल्याने तुमच्या कामामध्ये आणि जीवनात तुमचे लक्ष लागलं. निराशा, ताण, थकवा यांचा शीण घालवायचा असेल तर एखादं तुमच्या आवडीचं गाणं नक्की ऐका, यामुळे तुम्हाला नक्की रिफ्रेश वाटेल. द न्‍यूजथिंग मधील माहितीनुसार 2013 मधील एका संशोधनात संगीत ऐकल्याने तणाव कमी होत असल्याचे समोर आलं आहे.

कमी खाण्यासाठी ऐका संगीत

अशाप्रकारे संशोधनात समोर आले आहे की, ज्या रेस्टॉरंटमध्ये म्युझिक चालू असतं त्याठिकाणी इतर हॉटेल्सपेक्षा कमी खाणं खाल्लं जातं. विशेषत: ज्या  ठिकाणी शांत संगीत (Silent Music) आणि मंद प्रकाश असतो. यामुळे संगीत ऐकण्याचा हा खूप मोठा फायदा आहे.

लहान मुलांसाठी संगीत फायदेशीर

लहान मुलांच्या आजारांवरील अभ्यासानुसार ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांना संगीत (Music) सत्रामध्ये सामील  केल्यावर त्यांच्या सामाजिक प्रतिसाद, लक्ष आणि संवाद कौशल्यांमध्ये सुधारणा झाली. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये सामाजिक  कौशल्याचा अभाव असल्याचे दिसून येते.

शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर 

संगीत ऐकल्याने मनाची अस्वस्थता, शरीरातील रक्तदाब, श्वसनाची गती सुधारते. यामुळे शांत झोप येण्यास मदत होते. अनेक संशोधनात (Research) देखील हे समोर आलं आहे. शास्त्रीय संगीत (Indian classical music) ऐकल्याने छान शांत झोप लागत असल्याचं अनेक संशोधनात समोर आलं आहे. संगीत ऐकणाऱ्या लोकांना संगीत न ऐकणाऱ्याच्या तुलनेत चांगली झोप येत असल्याचे अनेक संशोधनात समोर आलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 14, 2021, 9:57 PM IST

ताज्या बातम्या