मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

FAIR & LOVELY तील 'फेअर' घालवण्यासाठी लढली ही मुंबईची मुलगी

FAIR & LOVELY तील 'फेअर' घालवण्यासाठी लढली ही मुंबईची मुलगी

ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीने प्रेरित होऊन या तरुणीने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फेअर अँड लव्हलीविरोधात ऑनलाइन याचिका केली होती.

ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीने प्रेरित होऊन या तरुणीने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फेअर अँड लव्हलीविरोधात ऑनलाइन याचिका केली होती.

ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीने प्रेरित होऊन या तरुणीने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फेअर अँड लव्हलीविरोधात ऑनलाइन याचिका केली होती.

मुंबई, 26 जून : फेअर अँड लव्हली (fair and lovely) या आपल्या इतक्या मोठ्या ब्रँडमधील फेअर शब्द काढण्याचा मोठा निर्णय हिंदुस्तान युनिलिव्हर (hindustan Unilever) कंपनीने घेतला. त्यानंतर प्रत्येकाला याचा आनंद झाला आहे, सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र याचं खरं यश जातं ते वर्णभेदविरोधी लढा देणाऱ्यांना आणि या लढ्यात महत्त्वाचं योगदान दिलं ते मुंबईतल्या अवघ्या 22 वर्षांच्या तरुणीने.

मुंबईतील चंदना हिरान (Chandana Hiran) तुमच्या-आमच्याप्रमाणेच टीव्ही आणि वर्तमानपत्रात फेअर अँड लव्हलीची जाहिरात पाहत लहानाची मोठी झाली. आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या रंगाचं कौतुक, अभिमान कधी वाटलाच नाही. उलट गोरेपणाचं जास्त आकर्षण वाटलं. मात्र फेअरच लव्हली का असा प्रश्न चंदनाला पडला.

न्यूज 18 शी बोलताना चंदना म्हणाली, "बॉलीवूड फिल्म्स असो, गाणी असो, कविता किंवा एवेंट आर्ट असो कृष्णवर्णीयांचा देश असूनही गौरवर्णालाच भारतात प्राधान्य दिलं गेलं. माझ्यासारखा रंग असलेल्या मुलींच लोकप्रिय संस्कृतीत प्रतिनिधीत्व करणारं असं कुणीच नाही. माझ्यासारखा रंगाची मुख्य अभिनेत्री मला कधी दिसली नाही, माझ्या रंगाचं समर्थन करणारी मॅगझीन किंवा जाहिरात मला कधी दिसली नाही. अगदी सोशल मीडिया आणि फोटो एडिटिंग साइटसवरील फिल्टर्समध्येही तुम्ही गोरं कसं दिसाल यावरच भर दिला जातो"

हे वाचा - FAIR & LOVELY तून फेअर जाणार असल्याने ही अभिनेत्री आनंदी, VIDEO तून झाली व्यक्त

यानंतर ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीने चंदना आणखी प्रेरित झाली. फेअर अँड लव्हली वरून चंदनाने HUL विरोधात change.org वर ऑनलाइन याचिका केली. ज्यावर फक्त दोन आठवड्यात तब्बल 15 हजार पेक्षा जास्त लोकांना आपल्या स्वाक्षरी करून त्याला पाठिंबा दिला.

"पाश्चिमात्य देशातील बीएलएम चळवळीला अनेक भारतील सेलिब्रिटींना पाठिंबा दर्शवला. तेव्हा भारतातील वर्णभेदाबाबतही प्रश्न उपस्थित झाले. कारण हे सर्वत्र आहे. फेअर अँड लव्हलीदेखील फेअरच लव्हली असते हे ते आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत होते, असं मला वाटलं त्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हरविरोधात याचिका केली आणि हे नाव बदलण्याची मागणी केली. बीएलएम चळवळीमुळेच कंपनीला असं पाऊल उचलण्यास भाग पडलं", असं ती म्हणाली

हे वाचा - Plasma Therapy चा कोरोना रुग्णांवर काय होतोय परिणाम? CMनी दिली महत्त्वाची माहिती

अमेरिकेत वर्णभेदावरून उफाळून आलेल्या वादानंतर जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या स्किन व्हाइटनिंग क्रिमची विक्री बंद करण्याची घोषणा केली त्यानंतर आता हिंदुस्तान युनिलिव्हरनेही हे पाऊल उचललं आहे.

"मला मी केलेल्या याचिकेतून आणखी काही अपेक्षित नाही. शेवटी फेअर अँड लव्हली हे कित्येक वर्षांपासून आहे. मात्र अशा ब्रँडचं नाव बदलणार हे योग्य दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे", असं चंदना म्हणाली.

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Fairness cream, Lifestyle