जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / FAIR & LOVELY तून 'फेअर' जाणार असल्याने या अभिनेत्रीला आनंद, VIDEO तून झाली व्यक्त

FAIR & LOVELY तून 'फेअर' जाणार असल्याने या अभिनेत्रीला आनंद, VIDEO तून झाली व्यक्त

FAIR & LOVELY तून 'फेअर' जाणार असल्याने या अभिनेत्रीला आनंद, VIDEO तून झाली व्यक्त

हिंदुस्तान युनिलिव्हरने (Hindustan Unilever) फेअर अँड लव्हलीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून : फिल्मसमध्ये दिसणाऱ्या सेलिब्रेटींप्रमाणे किंवा परदेशी नागरिकांप्रमाणे आपणही गोरं (fair) असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपल्या रंगाबाबत प्रत्येकाच्या मनात एक न्यूगंड निर्माण होतो आणि त्यामुळे गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रिमकडे सर्वांचा कल वाढतो. अशाच फेअरनेस क्रिमपैकी एक म्हणजे फेअर अँड लव्हली (Fair & Lovely). फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांच्याही सर्वाधिक पसंतीचं असलेला हा ब्रँड. मात्र आता त्यातील फेअर हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय हिंदुस्तान युनिलिव्हरने  (Hindustan Unilever) घेतल्यानंतर एका अभिनेत्रीला त्याचा आनंद झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali kulkarni) ला या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तिनं सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोनाली म्हणाली, “मला खूप आनंद झाला आहे या गोष्टीचा. आपण आशिया खंडात राहतो, आपण भारतात राहतो. आपल्या मातीशी, आपल्या हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग किंवा आपला वर्ण आहे. आपल्याला सगळ्यांना विदेशी गोरेपणाचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे गेली अनेक वर्षे आपण आपल्या रंगाला नाकारतो आहे. त्यामुळे स्वत:ला आपण नाकारतो आहोत आणि असे वेगवेगळे प्रयोग स्वत:ला गोरं करण्यासाठी आपण करत आहोत. याला आता आळा बसेल आणि आता आपण स्वत:ला स्वीकारू”

जाहिरात

सोनाली पुढे म्हणाली, “मला कधीच असं वाटत नाही ही नाटक-सिनेमांमध्ये आम्हाला आमच्या रंगाचा कधी समस्या आली. उलट भारतीय वर्ण सेलिब्रेट केला जातो इंटरनॅशनल सिनेमामध्ये. चांगले मेअकप आर्टिस्ट ड मेकअप करताना नो मेअकप लूप यावा यासाठी एक शेड डार्कर बेस करतात. नवशिके असतात ते गोरं बनवायला जातातच” हे वाचा -  Fair & Lovely तून ‘फेअर’ होणार गायब; 45 वर्षांनी कंपनीने घेतला मोठा निर्णय “लॉकडाऊनमध्ये एचयूएलच्या ज्या टीमने इतका सकारात्मक विचार केला आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना विशिष्ट रंगाचं असावं मग आपण सुंदर दिसतो या संकल्पेनतून बाहेर काढलं आहे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आपल्याला नेहमीच असं वाटतं की कलाकारांना त्यांच्या रंगाचा कॉम्प्लेक्स असेल. पण त्याहीपेक्षा सामान्य व्यक्तीला जो कॉम्प्लेक्स असतो सुंदर असण्याचा आणि गोरं दिसण्याचा, आता  फेअर हा शब्द काढून टाकल्याने तो कॉम्प्लेक्स नक्कीच निवळेल अशी आशा आपण करूया, असं सोनाली म्हणाली. हे वाचा -  अरे देवा! हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हर Ice Cream; आता हेच बाकी राहिलं होतं 1975 साली म्हणजे 45 वर्षांपूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हरने एक गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच केली होती. मात्र फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दामुळे गोरेपणा आणि उजळपणावर जास्त भर दिला जातो आहे. त्यामुळे कंपनीवर अनेकदा रंगभेद करत असल्याची, गोरेपणाच्या आकर्षणाचा व्यापार करत असल्याची टीकाही झाली. त्यामुळे आता आपल्या या ब्रँडचं नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. लवकरच यातून फेअर हा शब्द काढला जाणार आणि नवं नाव दिलं जाणार आहे. संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात