Home /News /lifestyle /

'फक्त Lata mangeshkar बऱ्या व्हाव्यात', मुंबईच्या रिक्षावाल्याने उपचारासाठी दिली आपली आयुष्यभराची पुंजी

'फक्त Lata mangeshkar बऱ्या व्हाव्यात', मुंबईच्या रिक्षावाल्याने उपचारासाठी दिली आपली आयुष्यभराची पुंजी

गायिका लता मंगेशकर यांचा फॅन असलेल्या मुंबईच्या ऑटो ड्रायव्हरने यांच्यासाठी फक्त प्रार्थना न करता त्यांच्या उपचारात आपला मोलाचा वाटाही दिला आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : सेलेब्रिटी म्हटलं की त्यांचे फॅन्स आलेच. काही फॅन्स तर असे असतात जे आपल्या आवडत्या सेलेब्रिटीही काहीही करू शकतात. सध्या गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar)  यांचा असाच एक चाहता चर्चेत आला आहे. ज्याने लता मंगेशकर यांच्यासाठी जे केलं ते कदाचित कुणीच करू शकणार नाही. लतादीदींचा फॅन असलेल्या मुंबईचा रिक्षावाल्याने त्यांच्या उपचारासाठी आपली आयुष्यभराची पुंजी दिली आहे (Mumbai auto driver give his earnings for Lata mangeshkar). भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे. त्यापैकीच एक आहे मुंबईतील सत्यवान गीते. जो एक रिक्षाचालक आहे. त्याने आपली संपूर्ण कमाई लतादीदी यांच्या उपचारासाठी दान केली आहे. हे वाचा - रिया चक्रवर्तीला आली Sushant Singh Rajput ची आठवण, शेअर केला UNSEEN VIDEO इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सत्यवान  लतादीदींचा इतका मोठा फॅन आहे की त्यांना फक्त गानकोकिळाच नव्हे तर देवी सरस्वतीचं रूप मानतो. त्याने आपला ऑटो लता मंगेशकरांच्या फोटोंनी सजवला आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या ऑटोवर लतादीदींच्या गाण्यातील बोलही पाहायला मिळतील. जेव्हापासून लता मंगेशकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तेव्हापासून तू सतत त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत.  लतादीदी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना त्याने आपल्या ऑटोवरही लिहिली आहे. हे वाचा - कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने बरा होतो कोरोना? उपायाबाबत डॉक्टर म्हणाले... गेल्या दहा दिवसांपासून ब्रीच कँडी रूग्णालयात आयसीयूमध्ये लतादीदींवर सुरू आहेत उपचार. कोरोनाबरोबरच त्यांना न्युमोनियाही झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. उपचारांना थोडा प्रतिसाद मिळत असला तरी अपेक्षेइतकी प्रकृतीत सुधारणा नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Autorickshaw driver, Lifestyle, Mumbai, Singer

    पुढील बातम्या