अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ रिया आणि सुशांतचा आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सुशांतसोबत जिममध्ये असलेली दिसून येत आहे. जिममध्ये रिया आणि सुशांत मजेशीर पोज देत आहेत. ते दोघेही व्हिडीओमध्ये फारच आनंदी दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताच नेटकरीसंमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. कारण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावण्यात आले होते. दरम्यान समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात तिला अटक झाली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. परंतु सुशांतचे चाहते आजही रियाला अनेक बाबतीत दोषी समजतात. परंतु अभिनेत्रीचे चाहते तिला मजबूत राहण्याचा सल्ला देताना दिसतात. (हे वाचा:Birth Anniversary: सुशांत सिंह राजपूतच्या 'या' गोष्टीने थक्क झाला होता धोनी) सुशांत सिंह राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ मध्ये पटना, बिहार येथे झाला होता.सुशांतने इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं होतं. परंतु अभिनयाची असलेली आवड त्याला गप्प बसू देत नव्हती. त्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. 'पवित्र रिश्ता' या मालिकेने सुशांतला घराघरात पोहोचवलं होतं. या मालिकेतून तो प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्यांनतर अभिनेत्याने बॉलिवूडकडे आपला मोर्चाचे वळवला होता. बॉलिवूडमध्ये सुद्धा फारच कमी वेळेत सुशांतने आपलं कौशल सिद्ध केलं होतं. त्याने अनेक दमदार चित्रपट देत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. परंतु १४ जून २०२० मध्ये अचानक त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली आणि संपूर्ण देश हादरला.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.