मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अननस, निवडुंगातून उगवलं नवं 'बीज'; अरुंधतीचा 'आऊट ऑफ बॉक्स' स्टार्टअप, प्रेरणादायी यशोगाथा

अननस, निवडुंगातून उगवलं नवं 'बीज'; अरुंधतीचा 'आऊट ऑफ बॉक्स' स्टार्टअप, प्रेरणादायी यशोगाथा

पर्यावरणस्नेही असणं ही आपली जीवनशैली आणि करियर कसं बनवू शकतो हे अरूंधतीकडे पाहून शिकता येऊ शकेल.

पर्यावरणस्नेही असणं ही आपली जीवनशैली आणि करियर कसं बनवू शकतो हे अरूंधतीकडे पाहून शिकता येऊ शकेल.

पर्यावरणस्नेही असणं ही आपली जीवनशैली आणि करियर कसं बनवू शकतो हे अरूंधतीकडे पाहून शिकता येऊ शकेल.

मुंबई, 29 मार्च : पर्यावरण संवर्धनासाठी आज जगभरात लोक आपला आवाज उंचावत आहेत. सोबतच त्यासाठी संघटित होऊन प्रयत्नही करत आहेत. मात्र ती केवळ काही लोकांची जबाबदारी नाही. त्यासाठी सर्वानीच आपापला वाटा उचलण्याची गरज आहे.

आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतानाही हा वाटा आपण उचलू शकतो. मुंबईला राहणारी अरुंधती नावाची तरुणी तेच करते आहे. अरुंधती आपलं स्टार्टअप चालवते. हे स्टार्टअप इको-फ्रेंडली अर्थात पर्यावरणस्नेही प्रॉडक्ट्स बनवून जगाला चांगलं आणि हिरवं ठेवण्यात खारीचा वाटा उचलतं आहे. या स्टार्टअपचं नाव आहे 'बीज'.

विशेष म्हणजे अननस, निवडुंग अशा विविध गोष्टींचा वापर करून अरुंधती एकदम फॅशनेबल ऍक्सेसरीज बनवून विकते. अरुंधतीची आई बंगाली आहे. त्या एक भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्यांना कायम हॅन्डलूम अर्थात हातमागावर तयार केलेल्या साड्या घालायला आवडतं. अरुंधतीनं आपल्या घरात हातमागाची उत्पादनं नेहमीच जवळून पाहिली.

अरुंधती अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये शिकली. एकदा युरोपमध्ये सुट्ट्या घालवल्यावर तिला पर्यावरणबदलामुळं होणाऱ्या नुकसानाची जाणीव झाली. तेव्हा तिच्या मनात हे स्टार्ट-अप सुरू करायचा विचार आला आणि तिनं युरोपहून वापस आल्यावर त्याची सुरवात केली.

हेही वाचा कुठे धुळवड तर कुठे उक्कुली.! वेगवेगळ्या राज्यांतील होळी साजरी करण्याच्या पद्धती

अरुंधती विविध प्रकारच्या बॅग्ज, वॉलेट आणि क्लचेस बनवते. त्यासाठी ती रिसायकल केलेल्या आणि बायोडिग्रेडेबल अर्थात विघटीत होऊ शकणाऱ्या गोष्टींचाच वापर करते. अरुंधती सांगते, 'की तिनं उदयपूरचा लेक पॅलेस आणि जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये नोकरी केली. इथं मला शाही जीवनशैली कळाली. राजस्थानानं मला नेहमीच भारावून टाकलं. इथलं संगीत, नृत्य, रंग आणि वस्त्रांनी माझ्यावर ठसा उमटवला. मी माझ्या 40 व्या वाढदिवशी पुन्हा एकदा युरोपची सहल केली. तिथं ३६ डिग्री तापमानात पर्यावरणबदलाचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं.'

हेही वाचा बापरे! नोकरीची अट म्हणून छातीचा X-Ray काढला आणि रिपोर्ट पाहून तरुण पुरता हादरला

यानंतर अरुंधतीनं पर्यावरणस्नेही वस्तूंच्या उत्पादन आणि वापराबाबत जागृती करायचं ठरवलं. तिनं मॅक्सिकोच्या कंपनीत विकसित केलेलं नोपल कॅक्टस हे मटेरियल वापरलं. हे खूप मऊ प्रकारचं चामडं असतं. यासह अजूनही विविध प्रकारच्या नव्या मटेरियल्सवर अरुंधती काम करते आहे. आता ती खास पुरुषांसाठीचं कलेक्शनही लॉन्च करणार आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्यानं तिला आपला ब्रँड पुढं न्यायचा आहे.

First published:
top videos

    Tags: Eco friendly, Environment, Rajasthan, Startup Success Story