मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Movie theaters in Pune: ‘ही’ आहेत पुणे स्टेशनजवळील बेस्ट सिनेमागृहे, बिनधास्त लुटा चित्रपटांचा आनंद

Movie theaters in Pune: ‘ही’ आहेत पुणे स्टेशनजवळील बेस्ट सिनेमागृहे, बिनधास्त लुटा चित्रपटांचा आनंद

Movie theaters in Pune: ‘ही’ आहेत पुणे स्टेशनजवळील बेस्ट सिनेमागृहे, बिनधास्त लुटा चित्रपटांचा आनंद

Movie theaters in Pune: ‘ही’ आहेत पुणे स्टेशनजवळील बेस्ट सिनेमागृहे, बिनधास्त लुटा चित्रपटांचा आनंद

Movie theater near Pune Station: तुम्ही जर पुणे स्टेशन परिसरात असाल, तर या भागामध्ये अनेक सिनेमागृहे आहेत. या सिनेमागृहामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या चित्रपटांचा आनंद लुटू शकता.

    पुणे, 16 ऑगस्ट: अलीकडच्या काळात प्रत्येकावरच कामाचा प्रचंड ताण असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळच सुरु असते. काम, शिक्षण व्यवसाय यामध्ये दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो याचा पत्तादेखील लागत नाही.  दररोजच्या कामातून अनेकांना सुखानं श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. खासकरून पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही धावपळ जरा जास्तच होते.  या धावपळीत आपण आपलं स्वत्वच हरवून बसतो. त्यामुळं आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून थोडं रिलॅक्स होणंही महत्त्वाचं आहे. रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही विविध गोष्टी करू शकता. फिरायला करणं, एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणं, ट्रेकिंगला जाणं इत्यादी गोष्टी करता येतात. रिलॅक्स होण्यासाठी आणखी एक सर्वोत्तम आणि स्वस्तातील मार्ग म्हणजे जवळच्या सिनेमागृहात जाणं आणि मस्तपैकी एखादा चित्रपट पाहणं होय. जर तुम्ही काही कामानिमित्त पुण्यामध्ये असाल, त्यातही पुणे स्टेशन परिसरात असाल, तर या भागामध्ये अनेक सिनेमागृहे आहेत. यापैकी काही सिनेमागृहामध्ये सिनेमा पाहायला तर तुम्हाला शंभर-सव्वाशे रुपयेही पूरे होतात. या  थिएटरमध्ये जावून तुम्ही तुमच्या आवडीच्या चित्रपटाचा आनंद लुटू शकता. आज आम्ही तुम्हाला पुणे स्टेशन जवळील काही सिनेमागृहांची (Movie theater near Pune Station) माहिती सांगणार आहोत. 1. आयनॉक्स (INOX)- पत्ता: प्लॉट नं. D, बंड गार्डन रोड, पुणे, महाराष्ट्र- 411001 फोन: 020 2605 0101 2. विक्ट्री थिएटर (Victory Theater)- पत्ता: 2429, ईस्ट सेंट, कयानी बेकरीच्या समोर, हुलशूर , कॅम्प , पुणे , महाराष्ट्र- 411001 फोन: 020 2613 2975 हेही वाचा-Best Restaurants in Thane: खवैय्ये आहात? ‘ही’ आहेत ठाण्यातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट, मिळेल चविष्ट जेवण 3. वसंत सिनेमा (Vasant Cinema)- पत्ता:  S No. 598, नानावाडाजवळ, छत्रपती शिवाजी महाराज रोड, प्रकाश विभाग स्टोअर समोर, बुधवार पेठ, पुणे, महाराष्ट्र-411002 फोन:  020-24458047 4. पीव्हीआर नितेश हब कोरेगाव पुणे (PVR Nitesh Hub Koregaon Pune)- पत्ता: दुसरा मजला, नितेश हब, एन में रोड, कोरेगाव पार्क अॅनेक्सी, कोरेगाव पार्क , पुणे, महाराष्ट्र- 411001 फोन: 080009 00009 5. सिटी प्राईड मंगला मल्टिप्लेक्स (City Pride Mangala Multiplex)- पत्ता: 111, छत्रपती शिवाजी महाराज रोड, समोर, तोफखाना, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र 411005 फोन: 020 2553 3468 6. राहुल टॉकीज 70 एमएम (Rahul Talkies 70 MM)- पत्ता: 3, गणेशखिंड आरडी, नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर , पुणे , महाराष्ट्र- 411004 फोन:+91 20 6529 0333 7. अलका टॉकीज (Alka Talkies)- पत्ता: 8/1 लाल बहादूर शास्त्री रोड टिळक चौक, बँक ऑफ इंडियाच्या पुढे, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र -411030 फोन: 020 2433 9982
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या