मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Best Restaurants in Thane: खवैय्ये आहात? ‘ही’ आहेत ठाण्यातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट, मिळेल चविष्ट जेवण

Best Restaurants in Thane: खवैय्ये आहात? ‘ही’ आहेत ठाण्यातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट, मिळेल चविष्ट जेवण

Best Restaurants in Thane: ठाणे परिसरात जेवणासाठी अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद लुटू शकता.

Best Restaurants in Thane: ठाणे परिसरात जेवणासाठी अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद लुटू शकता.

Best Restaurants in Thane: ठाणे परिसरात जेवणासाठी अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद लुटू शकता.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 08 ऑगस्ट: अलीकडच्या काळात प्रत्येकावरच कामाचा प्रचंड ताण असतो. प्रत्येकजण कामाच्या धबडग्यात अडकून पडलेला असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळच सुरु असते. काम, शिक्षण व्यवसाय यामध्ये दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो याचा पत्तादेखील लागत नाही. दररोजचं काम, त्यासाठी करावा लागणारा प्रवास, कामाचा ताण इत्यादी गोष्टीमुळं लोकांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. खासकरून मुंबईसारख्या चोवीस तास सुरु असणाऱ्या शहरात आपण आपलं स्वत्वच हरवून बसतो. लोकलमधील गर्दी, रोजची दगदग इत्यादीमुळं माणूस थकून जातो. लोकांना सुखानं श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. त्यामुळं आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून थोडं रिलॅक्स होणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करायला वेळ द्यायला हवा. तुम्ही फिरायला जाऊ शकता, मित्रांना भेटायला जाऊ शकता किंवा तुम्ही जर खवैय्ये असाल, तर तुम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. तुम्ही जर ठाण्यामध्ये असाल आणि तुम्हालाही आपल्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत चविष्ट जेवणाचा आनंद लुटायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला ठाणे स्टेशनजवळच्या काही खास हॉटेलची (Best Restaurants in Thane, Mumbai)  माहिती देणार आहोत. ठाणे स्टेशन परिसर नेहमीच गजबलेला असतो, अनेक लोक येथे कामानिमित्त येत असतात. ठाणे परिसरात जेवणासाठी अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. परंतु अनेकांना या भागातील चांगल्या रेस्टॉरंटची माहिती नसते. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. चला तर मग, आज पाहूया ठाणे स्टेशन परिसरातील काही प्रसिद्ध रेस्टॉरंटची यादी... 1. कँटोनीज चायनीज रेस्टॉरंट (Cantonese Chinese Cuisine)- पत्ता: शॉप नं.10, रत्नमणी सोसायटी, स्टेशन रोड, दादा पाटील वाडी प्लॅटफॉर्म नं. 1 समोर, शिवाजी नगर, ठाणे वेस्ट , ठाणे , महाराष्ट्र  400602 फोन: 022 2530 4740 2. फिश करी राईस कॅन्टीन (Fish Curry Rice Canteen)- पत्ता: 5XPG+XCH, फिश करी राईस कॅन्टीन समोर. ठाणे स्टेशन पोस्ट ऑफिस, ठाणे रेल्वे बुकिंग सेंटर जवळ, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र 400601 फोन: 097572 05040 3. मेटकुट (Metkut)- पत्ता: 1,2 झाल सेफायर, घंटाळी मंदिर रोड, समोर. घंटाळी मंदिर, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र  400602 फोन: 091361 21900 4. कृष्णा रेस्टो बार (Krishna Resto Bar)- पत्ता: 6 था मजला, कृष्णा प्लाझा, कृष्णा स्वीट्स शेजारी, शिवाजी पथ, ठाणे स्टेशन रोड, ठाणे, महाराष्ट्र  400602 हेही वाचा:Best Pizza in Bandra: वीकएण्डला मुंबईत फिरायला जाणार असाल तर इथे मिळेल बेस्ट पिझ्झा; 5 बेस्ट पिझ्झा रेस्टॉरंट्स 5. हॉटेल मैत्री रेस्टॉरंट (Hotel Maitri Restaurant)- पत्ता: दुकान क्रमांक 6,7,8, नारायण निवास, समोर. रेल्वे स्टेशन, ठाणे पूर्व, ठाणे, महाराष्ट्र 400603 फोन: 099308 53152 6. हॉटेल मालवण (Hotel Malva)- पत्ता: शॉप नंबर.ए 4/5, ए विंग, श्रीपाल अपार्टमेंट, मीनाताई ठाकरे रोड, भक्ती मंदिर, पंच पाखडी, ठाणे वेस्ट , ठाणे , महाराष्ट्रा  400602 फोन: 022 2536 8668 7. फूड टाउन (The Food Town)- पत्ता: त्रिमुत्री बिल्डिंग, महात्मा गांधी रोड, Oppo. शिवाचे सलून विष्णुनगर, नौपाडा जवळ, पोलीस स्टेशन, ठाणे, महाराष्ट्र  400602 फोन: 084338 43309 8. नव गोमंतक (Nav Gomantak)- पत्ता: पंच पाखडी, 1 त्रिशूल आपट, वेस्ट, इस्टर्न एक्स्प्रेस ह्वी, पंच पाखडी , ठाणे , महाराष्ट्र  400602 फोन: 099875 23017
First published:

Tags: Restaurant, Thane

पुढील बातम्या