मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

धक्कादायक! आईच्या चहाच्या तलफेमुळे बाळाची भयंकर अवस्था; एक वर्षाच्या चिमुकल्याची करावी लागली सर्जरी

धक्कादायक! आईच्या चहाच्या तलफेमुळे बाळाची भयंकर अवस्था; एक वर्षाच्या चिमुकल्याची करावी लागली सर्जरी

बाळासोबत घडलेल्या भयंकर दुर्घटनेनंतर आईने कधीच चहा न पिण्याचा निर्णय घेतला आहे.

बाळासोबत घडलेल्या भयंकर दुर्घटनेनंतर आईने कधीच चहा न पिण्याचा निर्णय घेतला आहे.

बाळासोबत घडलेल्या भयंकर दुर्घटनेनंतर आईने कधीच चहा न पिण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 21 जुलै : पावसाळा आणि चहा हे समीकरणच आहे. पावसाळ्याच गरमागरम चहा पिण्याचा मोह कुणालाच आवडत नाही. पण असे काही लोक आहेत ज्यांना चहा इतका आवडतो की वर्षाचे 12 महिने, दिवसातील 24 तास कधीही चहा दिला तरी चालतो. अति चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहेच पण यामुळे भयंकर दुर्घटनाही होऊ शकते. अशाच दुर्घटनेमुळे एका महिलेचं चहाची तलफ तिच्या चिमुकल्याला महागात पडलं आहे. इंग्लंडच्या केंटमध्ये राहणारी कर्रिए डॉयले एक वर्षाचा लेक मैसोनला घेऊन प्ले ग्रुपला जात होती. रस्त्यात एक रेस्टॉरंट लागलं. तेव्हा तिला चहा पिण्याची तलफ आली आणि ती रेस्टॉरंटमध्ये चहा प्यायला गेली. मैसोन तिच्या जवळच होता. अचानक गरम चहा त्याच्या अंगावर पडला. ज्यामुळे त्यांचं शरीर भाजलं. कर्रिएने सांगितल्यानुसार, ती मैसोनला पाळणाघरात घेऊन जात होती. रेस्टॉरंटच्या वेटरने तिच्या हातात बाळाची ट्रॉली पाहिल्याने त्याने चहा तिच्याजवळ आणून दिला. वेटरने तिच्याजवळ चहा आणून ठेवला आणि आपण चहा ठेवल्याचं सांगून तो निघून गेला. कर्रिएने वेटरचा आवाजही ऐकला. त्यानंतर तिला मैसोनचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तिने पायाला हात लावला तर त्याचा पाय गरम होता. त्याच्या अंगावरच चहा सांडल्याचं तिला समजलं. हे वाचा - 2 मिनिटांत प्यायला संपूर्ण बाटलीभर Digestive Medicine; फक्त 100 रुपयांसाठी गमावला लाखमोलाचा जीव ती खूप घाबरली. तिने लगेच त्याच्यावर थंड पाणी ओतलं आणिच अॅम्ब्लुन्सला कॉल केला. त्याला घेऊन ती हॉस्पिटलला गेली. डॉक्टर्सनी त्याची जखम स्वच्छ केली आणि त्याला पेनकिलर्स दिले. तब्बल चार तास त्याच्यावर सर्जरी झाली.  या घटनेमुळे कर्रिएला मोठा धक्का बसला आहे. लेकाची भयंकर अवस्था पाहून आपण आता कधीच चहा पिणार नाही, असं तिनं ठरवलं आहे. त्वचा भाजल्यास काय करावं? 1) त्वचेचा जो भाग भाजला असेल तो थंड पाण्यात बुडवा. बर्फ लावू नका, त्यामुळे त्वचेला हानी पोहोचेल. 2) किरकोळ भाजलं असेल तर तो भाग पाण्यात बुडवल्यानंतर बरा होता. काही वेळाने तुम्ही त्यावर बर्न क्रिम लावू शकता. 3) जास्त भाजलं असल्यास वाहत्या पाण्याखाली तो भाग स्वच्छ करा आणि त्यावर बँडेज लावा. 4) भाजलेल्या भागावर फोड येऊ लागल्यास ते फोडू नका. 5) फोड आपोआप फुटल्यास पाण्याने स्वच्छ करा आणि त्यावर अँटिबायोटिक क्रिम लावा. हे वाचा - Burning Tips: हात भाजल्यावर अनेकजण या चुका करतात; जखम त्यामुळं लवकर बरी नाही होत
 मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयातील सल्लागार प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टीव्ह सर्जन डॉ. श्रद्धा देशपांडे यांनी सांगितलं, "भाजलेल्या जखमांवरील उपचार हे व्यक्ती-व्यक्तीमध्ये भिन्न असू शकतात. इजा किती गंभीर आहे यावर हे अवलंबून असतं. यामध्ये फर्स्ट डिग्री बर्न, सेकंड डिग्री बर्न आणि थर्ड डिग्री बर्न पहायला मिळते.  फर्स्ट डिग्री बर्नमध्ये सनबर्नचा समावेश आहे. सेकंड डिग्री बर्न गंभीर असू शकते आणि वेदना, लालसरपणा, सूज आणि फोड येणं यांचा समावेश असतो आणि थर्ड डिग्री बर्न हा जीवघेणा ठरू शकते" "भाजलेल्या जखमांवर प्रामुख्याने थंडाव्याची गरज असते. भाजलेल्या त्वचेवरील भागाला कमी कमी 20 मिनिटांसाठी थंड पाण्याखाली ठेवणं गरजेचं आहे. किरकोळ बर्न्ससाठी कोणत्याही अँटीसेप्टिक क्रिमचा वापर करा जेणेकरून जखमेद्वारे होणारा संसर्ग टाळता येईल. जर 5 टक्क्यांपेक्षा जास्त भाजलं असेल तर डॉक्टरांकडे जाणं चांगलं आहे जेणेकरून जखम किती खोल आहे याचं अचूक मूल्यांकन करून त्यानुसार त्याचे उपचार करता येऊ शकतात. निर्जंतुकीकरण आणि ड्रेसिंगद्वारे ताबडतोब नियंत्रित केल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होतो", असा सल्ला डॉ. देशपांडे यांनी दिला आहे.
First published:

Tags: Lifestyle, Parents and child, Tea

पुढील बातम्या