मुंबई, 21 डिसेंबर : जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक म्हणजे आई आणि मुलीचे नाते. आई आपल्या मुलींना तिच्या आयुष्यात मिळालेल्या सर्व गोष्टी शिकवते. मुलींना सशक्त बनवण्यासाठी आईचे संगोपनही खूप महत्त्वाचे असते. मुलींसाठी घरात आई सावलीसारखी असते, जी तिला घरात स्थिरावण्यापासून बाहेरच्याही अत्यंत कठीण प्रसंगात धीर देते.
मुलींसाठी आई एखाद्या डोंगरासारखी असते, जी प्रत्येक परिस्थितीत तिच्या पाठीशी उभी असते. पण आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, ज्यामुळे आई आणि मुलीमध्ये अंतर निर्माण होते. काहीवेळा एखाद्या गोष्टीवरून आई आणि मुलीचे नाते विकोपाला जाते. अशा परिस्थितीत काही सोप्या मार्गांनी आई आणि मुलीचे नाते पुन्हा चांगले आणि घट्ट करता येऊ शकते.
Relationship Tips : लग्नानंतर आयुष्य सुखी होण्यासाठी प्रेमिकांनी आधीच करावा ‘या’ गोष्टींचा विचार
आई आणि मुलीमधील अंतर अशा प्रकारे दूर करा
नियमितपणे बोला : आईला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही तिच्याशी नियमितपणे बोलणे आवश्यक असते. जर तुम्ही आईपासून दूर राहात असा. तर तिला नियमित फोन करा आणि बोला. आईच्या आरोग्याविषयी विचारात राहा आणि तिच्या गरजा जाणून घ्या. असे केल्याने आईला एकटेपणा जाणवणार नाही आणि तुमच्यामध्ये चांगले नाते निर्माण होईल.
आईच्या गरजांची काळजी घ्या : वयानुसार आईच्या गरजांची काळजी घ्या. तुम्ही त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करा, आईला काही महत्त्वाच्या गोष्टी लागल्या तर त्या बाजारातून आणा, आईला कोणाला भेटायचे असेल तर तिला तिथे घेऊन जा.
विशेष प्रसंगी एकत्र राहा : कोणत्याही विशेष सणाला, तुम्ही तुमच्या आईला भेटण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या शहरात राहत असाल तर तुम्हाला व्हिडिओ कॉल किंवा कॉल करणे आवश्यक आहे.
वर्षातून एक सहल आवश्यक : तुम्ही तुमच्या आईसोबत वर्षातून किमान एका सहलीची योजना आखली पाहिजे. असे केल्याने तुम्ही तुमचे बालपण पुन्हा जगू शकाल आणि आईलाही उर्जेने भरलेले वाटेल.
...तर घटस्फोट हाच योग्य पर्याय! जोडीदाराच्या या चुकांकडे दुर्लक्ष करून नाही चालत
राग सोडून द्यायला शिका : जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल आईचा राग येत असेल तर तुम्ही तिच्याशी शांततेने बोलून त्यांच्यातील गैरसमज दूर करणे चांगले. कधीकधी आपल्या खास व्यक्तीबद्दलचा आपला राग आपल्याला आयुष्यभर पश्चात्ताप करण्यास भाग पाडतो. वेळोवेळो राग सोडून द्या आणि आईशी शांततेने बोलयला शिका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Daughter, Lifestyle, Mental health, Mother, Relationship tips