मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काहीही! खरंच असं कुणी फिट राहतं का? मॉडलचं Fitness Secret वाचूनच हैराण व्हाल

काहीही! खरंच असं कुणी फिट राहतं का? मॉडलचं Fitness Secret वाचूनच हैराण व्हाल

अमेरिकन मॉडल ट्रॉय कॅसी  (American Model Troy Casey) अशा पद्धतीने फिट राहतो ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

अमेरिकन मॉडल ट्रॉय कॅसी (American Model Troy Casey) अशा पद्धतीने फिट राहतो ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

अमेरिकन मॉडल ट्रॉय कॅसी (American Model Troy Casey) अशा पद्धतीने फिट राहतो ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 22 डिसेंबर : एक विशिष्ट वय झालं की त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. पण बरेच अभिनेते, अभिनेत्री, मॉडल्सना तुम्ही पाहाल तर अगदी पन्नाशी पार असले तरी ते विशीतील असल्यासारखे दिसतात. त्यांचं हेल्थ, फिटनेस, लूक पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटतं. हे लोक स्वतःला इतकं परफेक्ट कसं ठेवतात, असाच प्रश्न आपल्याला पडत. अमेरिकेतील अशाच एक प्रसिद्ध मॉडलने आपल्या हेल्थ आणि फिटनेसचं सिक्रेट (Fitness Secret) सांगितलं आहे. जे खूपच धक्कादायक आहे. एरिझोनामध्ये राहणारा ट्रॉय कॅसी (American Model Troy Casey) एकेकाळी खूप प्रसिद्ध मॉडल होता. तो आता 55 वर्षांचा आहे. या वयातही तो एकदम फिट आहे. त्याने आपल्या फिटनेसचं सिक्रेट सांगितलं आहे. तो अशा पद्धतीने फिट राहतो ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. आपली चमकदार त्वचा आणि सुपरफिट बॉडीचा राज आपली लघवी आहे, असा दावा ट्रॉयने केला आहे. आपण दररोज आपल्या त्वचेवर आपली लघवी चोळतो (Man Applying Urine On Skin). इतकंच नव्हे तर स्वतःचीच लघवी पित (Man Daily Drinks Urine)  असल्याचंही त्याने सांगितलं. हे वाचा - खळबळजनक! छातीत होती वेदना आणि डॉक्टरांनी महिलेच्या भलत्याच जागेचं ऑपरेशन केलं तुम्हाला हे विचित्र वाटत असलं तरी ट्रॉयच्या दैनंदिन जीवनशैलीचा हा एक भाग झाला आहे. 17 वर्षांपासून तो हेच करतो आहे. युरिन त्वचेवर चोळल्याने त्वचा चमकदार झाली तर हे प्यायल्याने बॉडी स्ट्रक्चर चांगलं झालं. असं तो सांगतो. तो रोज सकाळी लघवी पितो, ज्याला जो एनर्जीचा स्रोत सांगतो. लघवी प्यायल्याने आपल्या शरीरात जबरदस्त एनर्जी आल्याचा दावा करतो. कित्येक वेळा तर तो युरिन फास्टिंग करतो आणि कित्येक दिवस जुनी लघवी एनिमामार्फत बाहेर काढतो. यामुळे आपलं पोट फ्लॅट दिसत असल्याचं तो सांगतो. मेल ऑनलाईनशी बोलताना ट्रॉय सांगतो, लोक उलटसुलट काहीही खातात आणि आपली लघवी ट्राय करण्याला घाबरतात. युरिन थेरेपी (Urine Therapy In Ayurveda) एक प्राचीन पद्धत आहे, ज्याबाबत फार बोललं जात नाही. लघवीमध्ये अमिने अॅसिड, स्टेम सेल्स आणि अँटिबॉडीज असतात. हे वाचा - मोफत पूर्ण करणार तुमची प्रत्येक इच्छा; अडल्ट मॉडेलकडून फॅन्सना खास ख्रिसमस गिफ्ट त्याने आपल्या हेल्थचं सिक्रेट सांगणारं एक पुस्तकही लिहिलं आहे. ज्यात त्याने आपल्या 55 व्या वयातील गुड लुक्सचं सिक्रेट सांगितलं आहे.
First published:

Tags: Fitness, Model, Viral, Viral news

पुढील बातम्या