लंडन, 21 डिसेंबर : ख्रिसमस, न्यू इअर तोंडावर आलं आहे. फेस्टिव्ह सिझन म्हटलं गिफ्टही (Christmas gift) आलंच. कुणाला काय गिफ्ट द्यायचं याची तयारी तुम्हीही सुरू केली असेल. ब्रिटनमधील एका अडल्ट मॉडेलने तर आपल्या चाहत्यांना अनोखं ख्रिसमस गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे (Adult model Christmas gift). तिने आपल्या चाहत्यांची इच्छा फ्रीमध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओन्ली फॅन्स या अडल्ट वेबसाईटवर काम करणारी विस्टा वाइफ नावाची मॉडेल. ती मॉस्ट फेमस स्विंगर नावानेही प्रसिद्ध आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने ती आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आपल्या ओन्ली फॅन्स पेजवर ती फ्रीमध्ये सर्व्हिस देणार आहे. ज्यांची नोकरी नाही किंवा ज्यांची गर्लफ्रेंड त्यांना सोडून गेली असेल, अशा पुरुषांना आनंदी करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे.
डेली स्टारशी बोलताना तिनं सांगितलं की, माझ्याकडे अशा अनेकांचे मेसेज आले आहेत ज्यांनी नोकरी गेली आहे. त्यांना माझ्या पेजला सब्सक्राइब करायचं आहे पण त्यांच्याकडे पैसे नाही. काही लोक असे आहेत जे कामामुळे सणांच्या कालावधीतही कुटुंबापासून दूर आहेत. या सर्व कारणांमुळे मी एका दिवसाची फ्री सर्व्हिस देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून फेस्टिव्हलमध्ये लोकांना आनंद लुटता येईल.
हे वाचा - 66 वर्षांच्या आजोबांना हवी परफेक्ट जोडीदार; तिच्यासाठी रस्त्यावरच लावलं होर्डिंग
मॉडेलनं सांगितलं टिकटॉक, ओन्ली फॅन्समार्फत तिने खूप पैसे कमवले आहेत. आता ख्रिसमसच्या निमित्ताने ते परत करण्याची वेळ आहे. ख्रिसमस दिनी काही लोकांसोबत कुणी बोलणारंही नसतं आणि त्यामुळे ते खूप दुःखी होतात. आपल्या या निर्णयामुळे अशा व्यक्तींची मदत होईल आणि त्यांचं फेस्टिव्हल चांगल्या पद्धतीने जाईल.
सामान्यपणे पेज सब्सक्राइब करायला चार्ज द्यावा लागतो. पण एका दिवसासाठी ही मॉडेल फ्री सर्व्हिस देईल. पण त्यादिवशी ती लोकांसोबत फ्री चॅट करेल. तिथं लाइव्ह राहून पूर्ण दिवस लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल.
हे वाचा - प्रायव्हेटपार्टवर 278 पिअर्सिंग केलेल्या व्यक्तीने केला लैंगिक जीवनाविषयी खुलासा
विस्टाने सांगितलं की, ओन्ली फॅन्स पेजवर अडल्ट स्टंट करण्याची आयडिया तिच्या नवऱ्याने दिली होती. काही वेळा ती कपल्सनाही आपल्यासोबत इन्वाइट करते, जेव्हा त्यांची मुलं शाळेत गेलेली असतात. असे काही लोक आहेत जे या कामासाठी माझे आभार मानतात त्यांना त्यांच्या आयुष्यात याची मदत होते. नव्या वर्षाच्या निमित्ताने लोकांनी आपलं आयुष्य बिनधास्तपणे जगावं इतकाच सल्ला मी देते. लोकांकडून योग्य आणि सुरक्षित सल्ला घ्या, हे तुमच्या खूप कामी येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.