मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Drinking alcohol : दारू पिताना तुम्ही सर्रास करताय ही चूक; जाऊ शकता कोमात

Drinking alcohol : दारू पिताना तुम्ही सर्रास करताय ही चूक; जाऊ शकता कोमात

अल्कोहोलसोबत काय खाऊ नये?

अल्कोहोलसोबत काय खाऊ नये?

दारुसोबत काही लोकांना स्नॅक्सच्या रुपात वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. तसेच काही लोक दारूमध्ये सोडा, कोल्ड ड्रिंकसह इतर काही ड्रिंक्स मिक्स करतात. परंतु ही सवय देखील तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 24 ऑगस्ट : अनेक जण अल्कोहोलचे शौकीन असतात. कोणताही इव्हेंट असतो, कोणतेही सेलेब्रेशन असो साजरे करण्यासाठी अनेक जण अल्कहोल म्हणजेच दारूचा उपयोग करतात. दारूचे अति प्रमाणात सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. दारुसोबत काही लोकांना स्नॅक्सच्या रुपात वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. तसेच काही लोक दारूमध्ये सोडा, कोल्ड ड्रिंकसह इतर काही ड्रिंक्स मिक्स करतात. परंतु ही सवय देखील तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. तुमची छोटीशी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. त्यामुळे दारू, वाईन किंवा बिअरसारखे अल्कोहोलयुक्त ड्रिंक घेताना त्यासोबत काय खावे आणि काय खाऊ नये हे माहिती असणे खूप गरजेचे आहे. आज या लेखातून आपण याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

अल्कोहोलसोबत काय खाऊ नये?

सोडा किंवा कोल्ड ड्रिंक : अनेकांना दारुत सोडा किंवा कोल्ड्रिंक घालून पिण्याची सवय असते. दारूचा कडवटपणा कमी करण्यासाठी अनेक जण त्यात असे ड्रिंक्स मिक्स करतात. परंतु यामुळे तुम्हाला कार्डियाक अटॅक येऊ शकतो. तसेच अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन होते आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तुम्ही कोमात जाऊ शकता.

सूर्यास्तानंतर जन्मलेली माणसं असतात प्रचंड आशावादी; त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे आहेत खास पैलू

चिप्स किंवा तळलेले पदार्थ : दारूसोबत तळलेले पदार्थ खाल्ल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी विषासारखे काम करते.अल्कोहोलयुक्त ड्रिंकसोबत तुम्ही चिप्स किंवा तळलेले पदार्थ खात असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. त्यामुळे तुम्ही हाय कोलेस्टेरॉलचे रुग्ण असाल तर या सवयीमुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होऊ शकतो.

तळलेले शेंगदाणे : तळलेले शेंगदाणे किंवा काजू देखील अल्कोहोलसोबत खाणे टाळावे. यामुले गॅसची समस्या होऊ शकते. तसेच या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्यास तुम्हाला हाय कोलेस्टेरॉलची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ब्लड क्लॉटिंग देखील होऊ शकते.

पनीर किंवा चीज : अनेकदा लोक दारू पिल्यानंतर जेवणात पनीर किंवा चीज असलेले पदार्थ खातात. परंतु ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अल्कोहोलसोबत पनीर किंवा चीज खाल्लायने विषबाधा होऊ शकते. त्यामुळे अल्कोहोलसोबत पिझ्झा-पास्ता किंवा पनीरसारखे पदार्थ अजिबात खाऊ नका.

नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

दारुसोबत काय खाणे, पिणे योग्य?

- अल्कोहोलसोबत तुम्ही ब्रेड टोस्ट खाऊ शकता. यामुळे पोटातील अल्कोहोल ब्रेडमध्ये शोषले जाते आणि शरीराचे कमी नुकसान होते.

- अल्कोहोलमध्ये कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा घालून पिण्याऐवजी तुम्ही त्यात पाणी किंवा बर्फ घालून पिऊ शकता.

- अल्कोहोलसोबत तुम्ही स्नॅक्सच्या स्वरूपात भाजलेले चने, पोककॉर्न किंवा मुरमुरे खाऊ शकता.

- दारुसोबत चिप्स किंवा तळलेले पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही सोयाचाप किंवा चिनक खाऊ शकता.

First published:

Tags: Alcohol, Health Tips, Lifestyle, Processed food