मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खरंच तुम्ही खात असलेल्या Cadbury Chocolate मध्ये Beef आहे?

खरंच तुम्ही खात असलेल्या Cadbury Chocolate मध्ये Beef आहे?

कॅडबरी चॉकलेट (Cadbury chocolates) तयार करताना त्यात गोमांस अर्थात बीफचा (Beef) वापर केला जात असल्याचा दावा केला जातो आहे.

कॅडबरी चॉकलेट (Cadbury chocolates) तयार करताना त्यात गोमांस अर्थात बीफचा (Beef) वापर केला जात असल्याचा दावा केला जातो आहे.

कॅडबरी चॉकलेट (Cadbury chocolates) तयार करताना त्यात गोमांस अर्थात बीफचा (Beef) वापर केला जात असल्याचा दावा केला जातो आहे.

नवी दिल्ली, 19 जुलै : कॅडबरी चॉकलेट (Cadbury Chocolate) हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. कोणत्याही गोष्टीचं सेलिब्रेशन असो अथवा कोणाचा वाढदिवस असो, कॅडबरी भेट दिली जाते. अलीकडे रक्षाबंधन, दिवाळीसारखे भारतीय सणही कॅडबरीसह साजरे करण्याचा ट्रेंड दिसतो आहे. सध्या बाजारात कॅडबरी चॉकलेटचे नानाविध फ्लेवर्स कमी किमतीतल्या सिंगल पॅकपासून ते महागड्या सेलिब्रेशन पॅकपर्यंत विविध आकारांमध्ये उपलब्ध आहेत. सर्वांना मनापासून आवडणारं कॅडबरी चॉकलेट सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलं आहे. कॅडबरी चॉकलेटमध्ये गोमांस अर्थात बीफ (Beef) असल्याचं सांगितलं जातं आहे.

सर्वांच्या आवडत्या कॅडबरी चॉकलेटमध्ये बीफचा वापर केला जात असल्याचा दावा एका वेबसाइटने केला असून, त्याचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

'कॅडबरी चॉकलेट तयार करताना त्यात जिलेटिनचा (Gelatin) वापर केला जातो. जिलेटिन गोमांसापासून तयार केलेलं असतं. याचाच अर्थ असा, की कॅडबरी चॉकलेट बीफचा वापर करून बनवलेलं आहे,' असं या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. भारतीयांनी कॅडबरीवर बहिष्कार टाकावा, असं आवाहनही संबंधित वेबसाइटने केलं आहे.

हे वाचा - चिनी लोक गर्भनाळही सोडत नाहीत; बाळाला जन्म देताच आईसुद्धा पिते प्लेसेंटा सूप

अनेक लोकांनी या स्क्रीनशॉटचा आधार घेऊन भारतात मिळत असलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये बीफचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे.

कंपनीने मात्र या दाव्याचं पूर्णतः खंडन केलं आहे. ही पोस्ट पूर्णतः भ्रामक असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. स्क्रीनशॉटमध्ये दर्शवलेलं उत्पादन भारताशी संबंधित नसल्याचं म्हटलं आहे. 'कॅडबरीच्या रॅपरवरचा हिरव्या रंगाचा चौकोन हे उत्पादन भारतात निर्मिलेले असून, ते संपूर्ण शाकाहारी (Vegetarian) आहे, असं दर्शवतो.

हे वाचा - स्वादुपिंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी असा घ्या आहार; अ‍ॅसिडिटीचा त्रास होईल कमी

अशा भ्रामक आणि नकारात्मक पोस्टमुळे ग्राहकांचा ब्रँडवरचा (Brand) विश्वास कमी होऊ शकतो. कोणत्याही उत्पादनाविषयी अशा प्रकारच्या पोस्ट पुढे फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याबाबत योग्य ती शहानिशा संबंधित व्यक्तीने करून घेणं गरजेचं आहे, असं आवाहन कंपनीने केलं आहे.

First published:

Tags: Dairy, Food, Lifestyle