हिऱ्याची अंगठी कुणाला आवडत नाही. आपल्याकडे एक तरी डायमंड रिंग (Diamond Ring) हवी असं स्वप्नं बहुतेकांचं असतं. भारतातल्या अशाच एका डायमंड रिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.
2/ 7
हैदराबादमध्ये तयार करण्यात आलेल्या अंगठीची गिनीज बुकमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे.
3/ 7
चंदूभाई डायमंड स्टोरचे के. कोट्टी श्रीकांत यांनी ही अंगठी तयार केली आहे. या अंगठीचं नाव आहे. 'द डिवाइन - 7801 ब्रह्म वज्र कमलम'
4/ 7
या अंगठीची गिनीज बुकमध्ये नोंद होण्याचं कारण म्हणजे त्यावरील हिरे. एकाच अंगठीवर तब्बल 7801 हिरे बसवण्यात आले आहेत.
5/ 7
2018 साली अंगठी कशी बनवण्याची त्याचा प्लॅन तयार करण्यात आला आणि 2019 साली ही अंगठी तयार झाली. अंगठी तयार करण्यासाठी तब्बल 10 महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागला.
6/ 7
या अंगठीचा आकार ब्रह्मकमळासारखा आहे. 6 लेअर्सचीही ही अंगठी आहे, प्रत्येक लेअर्सवर 8 पाकळ्या आहेत.
7/ 7
गेल्या वर्षी ही अंगठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी देण्यात आली होती. या अंगठीला मोस्ट डायमंड्स सेट इन वन रिंग म्हणून नोंद झाली आहे.