मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनाच्या दहशतीत टेन्शन फ्री होऊन सणांचा आनंद कसा लुटावा? तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

कोरोनाच्या दहशतीत टेन्शन फ्री होऊन सणांचा आनंद कसा लुटावा? तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

कोरोना (Covid) च्या तणावपूर्ण काळानंतर आता कुठे ख्रिसमस आणि नववर्षाचा जल्लोषपूर्ण काळ आला आहे. पण यादरम्यानही काही जणांना तणाव किंवा तणावांशी निगडीत घटनांचा सामना करावा लागतो.

कोरोना (Covid) च्या तणावपूर्ण काळानंतर आता कुठे ख्रिसमस आणि नववर्षाचा जल्लोषपूर्ण काळ आला आहे. पण यादरम्यानही काही जणांना तणाव किंवा तणावांशी निगडीत घटनांचा सामना करावा लागतो.

कोरोना (Covid) च्या तणावपूर्ण काळानंतर आता कुठे ख्रिसमस आणि नववर्षाचा जल्लोषपूर्ण काळ आला आहे. पण यादरम्यानही काही जणांना तणाव किंवा तणावांशी निगडीत घटनांचा सामना करावा लागतो.

मुंबई, 23 डिसेंबर : नाताळ (Christmas 2021) आणि नववर्षाचे (New year 2022) वेध आता सगळ्यांनाच लागले आहेत. हा काळ उत्साहात कसा घालवता येईल आणि तणाव कसा टाळता येईल याचा विचार प्रत्येकच जण करत असतो. डिसेंबरमध्ये सगळे सहलींचं प्लॅनिंग सुरू करतात. पण आता कोविड काळानंतर फिरायला जायचं तर काळजी घ्यायला हवी. सुरक्षित पण हे उत्सव कसे साजरे करता येतील असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

कोरोना (Covid) च्या तणावपूर्ण काळानंतर आता कुठे ख्रिसमस आणि नववर्षाचा जल्लोषपूर्ण काळ आला आहे. पण यादरम्यानही काही जणांना तणाव किंवा तणावांशी निगडीत घटनांचा सामना करावा लागतो. कुटुंबातील वादविवाद किंवा आर्थिक समस्या या पण त्रास देतात.अशा काळात उमेदीचा किरण म्हणून माइंडफुलनेस ध्यानधारणेकडे (Mindfulness Meditation) पाहिलं जात आहे. जे आपल्या समस्यांवरील निराकारण नसलं तरी तणाव टाळण्यास मदत करणारं नक्कीच आहे. तणाव (Stress) टाळण्यासाठी काय करता येईल? टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार याबाबत मेलबर्न विद्यापीठातील तज्ज्ञ निकोलस टी व्हॅन डॅम यांनी माहिती दिली आहे ती जाणून घेऊया.

द कॉन्व्हर्सेशनमध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये निकोलस यांनी सांगितलं आहे की, प्रत्येक जण माइंडफुलनेसच्या परिभाषेशी सहमत नाही. पण साधारणतः विशेष पद्धतीने एका ठिकाणी ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे काही अशा क्रिया, ज्यांच्या माध्यमातून एखाद्या विशेष गोष्टी किंवा अनुभवावर लक्ष केद्रित केलं जात. माइंडफुलनेस मेडिटेशनच्या अभ्यासात साधारणतः एका ठिकाणी शांत बसणे, डोळे बंद करणे आणि आपल्या श्वसनावर लक्ष क्रेंदित करणे याचा समावेश होतो.

हे वाचा - कामाचा तणाव, पैशांची चिंता ठरतेय हार्ट अटॅकचे कारण; हे उपाय ठरतील फायदेशीर

तणावाची अशी अनेक कारणं किंवा समस्या असू शकतात, ज्यावरील उपाय माइंडफुलनेस मेडिटेशन नाही. हे जातीयवाद, आर्थिक असमानता, कामाचं वाईट स्थिती, मानवाधिकारांचं उल्लंघन किंवा उपचारांची कमतरता यासारख्या सामाजिक समस्याचं निराकारण करू शकत नाही. कोणालाही माइंडफुलनेस मेडिटेशनचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणं हे सामाजिक परिवर्तनाचं एक साधन ठरू शकतं. जसं असमानतेबाबत जागरूकता किंवा मनातील अढी दूर करण्यासाठी हे मोठे पाऊल ठरेल.

निकोलस एका उदाहरणात सांगतात की, फक्त मेडिटेशनच्या सूचनेने समस्याचं निराकारण होणार नाही. ध्यानाबाबत कोणत्याही चुकीच्या पावलाचं एक उदाहरण म्हणजे अमेझॉनमधील झेन बूथ होय. जिथे तणावग्रस्त श्रमिकांना माइंडफुलनेस मेडिशनसाठी करायची संधी मिळते. पण त्या मुद्द्यांबाबत काहीच करण्यात येत नाही. ज्यामुळे त्यांना तणाव जाणवतो.

सुट्ट्यांच्या काळात माइंडफुलनेस मेडिटेशनने तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सामाजिक आणि राजकीय विचारांबाबतीतले मतभेद दूर होणार नाहीत. पण या ध्यानधारणेमुळे तुमच्यातील जे मतभेद आहेत ते जाणून घेणं नक्कीच सोपं जाईल. सकारात्मक भावनांना विकसित केल्यास केंद्रित ध्यान करूणेशी अधिक जुळवून घेता येईल आणि हे व्यक्तीला कोणाबाबतही मत बनवण्याआधी विचार करण्याची क्षमता देते.

वादविवाद आणि तणावामध्ये असंही होऊ शकतं की, तुम्ही अजून काही दिवसाच्या सुट्ट्यांच्या, उत्सवांच्या शोधात असाल.पण तुमचं मन शांत करण्यासाठी ध्यान उपयोगी पडेल. फिरायला गेलं तर वातावरणात बदल होईल पण ध्यान होणार नाही.

हे वाचा - Year Ender: वर्ष 2021 मध्ये आरोग्याशी संबंधित या 7 वस्तू सर्वाधिक विकल्या गेल्या

नियमितपणे ध्यानधारणा करण्याऱ्यांच्या सर्वेक्षणात हे आढळून आलं आहे की, त्यांचा अनुभव असामान्य नव्हता. पण इतर शोधात असं कळलं की, 25 टक्के अधिक नियमित ध्यानधारणा करण्याऱ्यांना अप्रिय घटनांचाही सामना करावा लागला. जसं वाढलेली चिंता. सुरूवातीच्या काळात लक्ष न लागणं आणि यामुळे नैराश्य जाणवणं हे साहजिक आहे. कधी कधी यामुळे तुम्हाला असंही वाटेल की, ध्यानधारणा कामी येत नाही. पण भटकणारं मन ध्यानाने हळूहळू जागेवर येईल.

चांगली बातमी ही आहे की, माइंडफुलनेस मेडिटेशन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर चिंता, नैराश्य (Depression) कमी होण्यासोबतच चांगले विचार करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. ध्यानधारणेमुळे तुमच्या सुट्ट्या अगदीच आल्हाददायक होणार नाहीत. पण यादरम्यानचा तणाव कमी होऊन त्या सार्थकी नक्कीच लागतील.

First published:

Tags: Festival, Health, Lifestyle, Mental health