मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कामाचा तणाव आणि पैशांची चिंता ठरतेय हार्ट अटॅक, स्ट्रोकचे कारण; हे उपाय ठरतील फायदेशीर

कामाचा तणाव आणि पैशांची चिंता ठरतेय हार्ट अटॅक, स्ट्रोकचे कारण; हे उपाय ठरतील फायदेशीर

Workplace pressure increase the risk of stroke : कामाच्या ठिकाणचा तणाव (Work Place Pressure) आणि पैशाची चिंता (Money Worries) आरोग्यावर परिणाम करते. यामुळे स्ट्रोक (Stroke) आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका सुमारे 30 टक्क्यांनी वाढतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 22 डिसेंबर : आजच्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ताण-तणावाचा सामना करत आहे. काहींवर घरगुती जबाबदाऱ्यांचे दडपण असते, तर काहींवर ऑफिस किंवा व्यवसायातील कामगिरीचा ताण असतो. हा दबाव किंवा प्रेशर कशाचेही असो शेवटी आरोग्यास ते घातक असते. जास्त टेन्शन घेतल्याने एखादी व्यक्ती तणावग्रस्त देखील होऊ शकते. स्वीडनच्या गोथेनबर्ग विद्यापीठाने (University of Gothenburg) केलेल्या अभ्यासात, असा दावा करण्यात आला आहे की, कामाच्या ठिकाणचा तणाव (Work Place Pressure) आणि पैशाची चिंता (Money Worries) आरोग्यावर परिणाम करते. यामुळे स्ट्रोक (Stroke) आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका सुमारे 30 टक्क्यांनी वाढतो. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या अभ्यासात अनेक देशांतील एक लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. प्रदीर्घ मानसिक तणावामुळे शरीरातील कोर्टिसोलचे प्रमाण वाढते, असे समोर आले. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर आणि रक्तदाब (Workplace pressure increase the risk of stroke) वाढतो. या अभ्यासात 30 ते 70 वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. वाढत्या वयासोबत मानसिक ताण-तणावही वाढत असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञ काय म्हणतात या अभ्यासाचे नेतृत्व करणाऱ्या अॅनिका रोसेन्ग्रेन यांनी सांगितले की, कामाच्या ठिकाणचा दबाव आणि पैशाची चिंता यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि रक्त गोठण्याचा धोकाही वाढतो. डॉ. अॅनिका रोसेन्ग्रेन यांनी सांगितले की, तीव्र तणावग्रस्त लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका नेमका कशामुळे होतो, हे माहीत नाही. 'पण शरीरात एथेरोस्क्लेरोसिससारख्या अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया असतात आणि तणावामुळे रक्त गोठण्यावर परिणाम होऊ शकतो. आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल, तर आपल्याला तणाव हा आणखी एक बदलता येण्याजोगा (modifiable risk factor) जोखीम घटक मानला पाहिजे. निरोगी जीवनशैली अंगीकारणे महत्त्वाचे अभ्यासानुसार, हृदयरोगामुळे जगभरात दरवर्षी सुमारे 180 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. हृदयविकार हे जगातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनत आहे. हे टाळण्याचा मार्ग म्हणजे सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैली. वयाच्या ४० वर्षांनंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केलाच पाहिजे.
First published:

Tags: Heart Attack, Tips for heart attack

पुढील बातम्या