मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कॅन्सरग्रस्त मैत्रिणीसाठी 3 महिन्यांपूर्वी तिने सुरू केलं ऑलनाइन Organic Store, महिन्याला कमावते एक लाख

कॅन्सरग्रस्त मैत्रिणीसाठी 3 महिन्यांपूर्वी तिने सुरू केलं ऑलनाइन Organic Store, महिन्याला कमावते एक लाख

'डॉक्टरांनी माझ्या मैत्रिणीला ऑरगॅनिक प्रॉ़डक्ट्स वापरायला सांगितलं. तेव्हा आमच्या लक्षात आलं, यासाठी एखादा प्लॅटफॉर्म असायलाच हवा.'

'डॉक्टरांनी माझ्या मैत्रिणीला ऑरगॅनिक प्रॉ़डक्ट्स वापरायला सांगितलं. तेव्हा आमच्या लक्षात आलं, यासाठी एखादा प्लॅटफॉर्म असायलाच हवा.'

'डॉक्टरांनी माझ्या मैत्रिणीला ऑरगॅनिक प्रॉ़डक्ट्स वापरायला सांगितलं. तेव्हा आमच्या लक्षात आलं, यासाठी एखादा प्लॅटफॉर्म असायलाच हवा.'

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : दिव्या राजपूत मूळची दिल्लीची. तिनं आजवर 20 वर्ष शिक्षण क्षेत्रात (education sector) काम केलं आहे. ती मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समध्येही कार्यरत होती. आता दिव्या आपल्या चार दोस्तांसह मिळून एक इको फ्रेंडली स्टार्टअप (Eco friendly start up) चालवते आहे. इथं ती रोजच्या गरजेच्या असलेल्या जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन विकत असते.

आता तीन महिन्यांपूर्वीच दिव्यानं आपल्या चार दोस्तांसह मिळून एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. तिला इतक्या कमी काळातच दर महिन्याला जवळपास 200 ऑर्डर्स येत आहेत. 1 लाख रुपयांपर्यंतचा बिझनेस ती सध्या करते आहे. सोबतच दिव्यासोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात 200 हून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या उपजीविकेला दिव्याच्या माध्यमातून हातभार लागतो आहे.

43 वर्षांची दिव्या सांगते, की माझी दोस्त काकुल रिझवी एक मार्केटिंग प्रोफेशनल होती. तिला कॅन्सर (cancer) झाला. डॉक्टरांनी आम्हाला ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स (organic products) वापरण्याचा सल्ला दिला. त्यादरम्यान आम्हाला वाटलं, की देशात सध्या असे प्लॅटफॉर्म्स कमी आहेत जे किफायतशीर दरात ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स विकतात. तेव्हा आम्ही प्लॅन केला, की आपणच असा एक मंच उभारू या.

हेही वाचाजगात कोणीच दिलं नसेल असं व्हेलेंटाइन गिफ्ट; पत्नीचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

या मंचावर रोजच्या गरजेची प्रत्येक वस्तू ऑरगॅनिक रूपातली मिळते. यानंतर मी माझी नोकरी सोडून दिली. काकुल इको (Kakul echo) नावानं आपलं स्टार्ट अप (start up) सुरू केलं. मात्र दरम्यान कॅन्सर झालेल्या काकुलचं निधन झालं. दिव्या एकटी पडली. तिला वाटायचं, की आता पुढचा प्रवास खरोखर अवघड असणार. मात्र त्यातूनही स्वतःला सावरत तिनं काम सुरू ठेवलं. थोड्या दिवसांनी पूजा अरोरा, सुरभी सिन्हा आणि क्रिस्टीना ग्रोव्हरही दिव्यासोबत जोडल्या गेल्या.

दिव्याची टीम सध्या 100 प्रकारची उत्पादनं तयार करते. यात स्टेशनरीचं सामान, ज्यूट आणि कॅनव्हासच्या बॅग्स, हँडमेड क्राफ्ट, हळद, वेलनेस प्रॉडक्ट्स (wellness products)अशा गोष्टी आहेत. सोबतच विविध सणांवेळी अनेक खास गोष्टीही तयार केल्या जातात. सगळ्या प्रॉडक्ट्सचं वेष्टन हे बायोडिग्रेडेबल असतं.

देशातल्या अस्सल कारागिरांना आपला मंच उपलब्ध करून देणं हे प्रियाचं स्वप्न आहे. त्यांना मोठ्या मार्केटपर्यंत पोचवण्यासाठी ती हरप्रकारचे प्रयत्न करणार आहे.

First published:

Tags: Cancer, Delhi News, Inspiring story, Lifestyle, Money, Motivation, Online shopping, Startup