मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोना संसर्गाचा Menstrual Period वर परिणाम होतो? तज्ज्ञ काय म्हणतात वाचा

कोरोना संसर्गाचा Menstrual Period वर परिणाम होतो? तज्ज्ञ काय म्हणतात वाचा

कोरोनातून बऱ्या झालेल्या महिला मासिक पाळीची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जात आहेत.

कोरोनातून बऱ्या झालेल्या महिला मासिक पाळीची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जात आहेत.

कोरोनातून बऱ्या झालेल्या महिला मासिक पाळीची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जात आहेत.

मुंबई, 28 मे : कोरोना संसर्गाचा (Coronavirus) शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम होत असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. अलिकडे आलेल्या माहितीनुसार कोरोनातून बरं झाल्यानंतर मासिक पाळीसंबंधी (Menstrual problem after corona infection) तक्रारी घेऊन अनेक महिलांनी उपचाराकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडे धाव घेतली आहे. यामध्ये पाळी लांबणे, मासिक पाळी दरम्यान कमी अधिक रक्तस्राव होणे, मासिक पाळीची अनियमितता, रक्ताच्या गाठी आणि मूड स्विंग आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

आजारपण, कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमी झालेली शारीरिक हालचाल आणि आजाराचा ताण यामुळेही मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊ शकतात. लॉकडाऊनच्या काळात पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन डिसीज) असलेल्या महिलांना व्यायाम करणं शक्य झालं नाही. तसंच वर्क फ्रॉम होम असल्याने खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या सवयी आणि वेळा बदलल्या. जंकफूड खाणं जास्त झालं. त्यामुळे वजन वाढल्याचा त्रास झाला. यामुळे महिलांना मासिक पाळीचे त्रास उद्भवत असल्याचे दिसून येते.

हे वाचा - लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा; पहिल्या कोरोना लशीला हिरवा कंदील

मदरहूड रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणाल्या, कोरोना संसर्गाचा परिणाम हा एकंदरीतच संपूर्ण आरोग्यावर होतो. मासिक पाळीदेखील महिलांच्या आरोग्याचाच एक भाग असून साहजिकच त्यावरही संसर्गाचा काहीसा परिणाम होतोच. संसर्गातून बऱ्या झालेल्या अनेक महिला मासिक पाळी संबंधित तक्रारी घेऊन रुग्णालयात दाखल होत आहेत. तीव्र संसर्ग झालेल्या महिलांमधील अंडाशयावर देखील परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. याचा महिलांच्या मासिक पाळीवरही परिणाम होऊ शकतो. कोव्हिडनंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने प्रजनन प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता असते.

हे वाचा - Menstrual Day : अंधविश्वास नको, समजून घ्या त्या दिवसांतील नियमांमागील खरं लॉजिक

तर मुंबईतील डॉ. दीपाली घाडगे यांनी सांगितलं, कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे महिलांना हार्मोनल समस्या उद्भवल्या आहेत. त्यांना मासिक पाळीचा त्रास होत असून यात घाबरून जाण्यासारखं काही नाही. जसजसं संसर्गातून शरीर सावरू लागेल तसतसं आपल्या शरीरातील हार्मोनल असंतुलन, मासिक पाळीसंबंधी तक्रारी देखील दूर होऊ लागतील. अनेकदा संसर्गादरम्यान रुग्णांना देण्यात आलेली औषधं, सुरू असलेल्या उपचारांमुळे मासिक रक्तस्राव अथवा हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. मात्र ठराविक काळानंतर तो पूर्ववत देखील होतो.

अनियमित मासिक पाळीची कारणं कोणती

ताणतणाव

सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता करणं.

अनियंत्रित हार्मोन

ॲनेमिया

अपुरी झोप

चुकीच्या आहाराच्या सवयी

अयोग्य जीवनशैली

मासिक पाळी संबंधी तक्रारी दूर करण्यासाठी काय कराल?

सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करा.

शरीर अॅक्टिव्ह ठेवा, व्यायाम करा. वजन नियंत्रित ठेवा.

समतोल आहार घ्य. हिरव्या पालेभाज्या, प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा.

रक्तवाढीसाठी गोळ्या जरी घेतल्या नाही तरी शेंगदाणे, गूळ, चिक्की, पेंडखजूर या पदार्थांचा आहारात समावेश करा.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Health, Period, Woman