मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Menstrual Hygiene Day: अंधविश्वास नको, समजून घ्या 'त्या' दिवसांतील नियमांमागील खरं लॉजिक

Menstrual Hygiene Day: अंधविश्वास नको, समजून घ्या 'त्या' दिवसांतील नियमांमागील खरं लॉजिक

टॅम्पोन योनीमध्ये अडकतो. रक्तस्त्राव व्हायला लागल्यावर फुगतो. मात्र टॅम्पोन आकाराने छोटा असल्याने अगदी आत पडद्या पर्यंत जात नाही. याच्या मागच्या बाजूला एक धागा असतो. ज्यामुळे टॅम्पोन सहजणे बाहेर काडता येतो

टॅम्पोन योनीमध्ये अडकतो. रक्तस्त्राव व्हायला लागल्यावर फुगतो. मात्र टॅम्पोन आकाराने छोटा असल्याने अगदी आत पडद्या पर्यंत जात नाही. याच्या मागच्या बाजूला एक धागा असतो. ज्यामुळे टॅम्पोन सहजणे बाहेर काडता येतो

मासिक पाळीच्या (Menstrual period) कालावधीत महिलांवर अनेक निर्बंध लादली जातात.

  मुंबई 28 मे: मासिक पाळी (Menstrual) ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत. आपल्या देशात मासिक पाळीचा संबंध धार्मिक बाबींशी जोडला जातो. आजही काही घरांमध्ये मासिक पाळी आल्यानंतर मुलींना, महिलांना वेगळं बसवलं जातं.  त्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी म्हणजे संकट वाटतं. आधुनिक काळातही जगभरातील अनेक देशांमध्ये मासिक पाळीबाबत विचित्र परंपरा आहेत. महिला आणि मुलींच्या सामाजिक, सांस्कृतिक आयुष्यावर याचा फार मोठा परिणाम होतो.

  मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत या उद्देशानं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) 2014 पासून 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन (World Menstrual Hygiene Day) म्हणून जाहीर केला. मात्र याचा पाया 2013 मध्ये जर्मनीतील (Germany) वॉश युनायटेड (WASH United) या संघटनेनं घातला . या संघटनेनं हा विशेष आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2014 मध्ये त्याला जागतिक पातळीवर मान्यता देण्यात आल्याचं सांगितलं जातं.

  हे वाचा - पुरुषांनो, तुम्ही तुमची Pregnancy Test केली का?

  मासिक पाळीबाबत जागरूकता वाढवणं आणि याविषयी मोकळेपणानं बोलण्यास, चर्चा करण्याबाबत असलेला संकोच दूर करणं आणि मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता आणि आरोग्य याबाबत निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना योग्य कृती करण्यास भाग पाडणं या उद्देशानं हा दिवस पाळण्यात येतो.

  मासिक पाळीत पूजा करू नये, मंदिरात जाऊ नये

  खरंतर, मासिक पाळी म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकलं जाणारं गर्भातील अस्तर असतं. गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते, त्याला आपण मासिक पाळी म्हणतो. पण या काळात स्त्रियांना अपवित्र मानलं जातं. त्यांना मंदिरात किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची परवानगी नसते. खरंतर ही एक नैसर्गिक शरीर प्रक्रिया (Natural Biological Process) आहे. याचा धर्माशी किंवा पावित्र्याशी काहीही संबध नाही.

  मसाले किंवा लोणच्याच्या बरणीला हात लावू नये, स्वयंपाकघरात जाऊ नये

  मासिक पाळीदरम्यान महिलांना मसाल्याच्या (Spices) किंवा लोणच्याच्या बरणीला (Pickles) हात लावू दिला जात नाही. यामुळे ते नासतं अशी एक गैरसमजूत रुढ आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया मासिक पाळीच्या काळात कापडाचा वापर करत असत. त्यामुळं त्यांच्या हातावर किंवा अन्यत्र सूक्ष्म किटाणू असत. त्यामुळे लोणचे किंवा स्वयंपाक घरातील गोष्टींना हात लागल्यास त्या खराब होण्याची शक्यता असे; पण आता सॅनिटरी पॅडचा (Sanitary Pad) वापर केला जात असल्यानं अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळं महिलांना स्वयंपाकघरात वावरण्यास किंवा स्वयंपाक करण्यास मनाई करण्याचं काहीही कारण नाही.

  बेडवर झोपू नये

  याचप्रमाणे महिलांना बेडवर झोपण्यास बंदी घातली जाते. हेही चुकीचे आहे. पूर्वी कापड वापरले जात असे तेव्हा डाग पडण्याची शक्यता असे. त्यामुळे असं बंधन घातलं जात असे, पण आता सॅनिटरी पॅडचा वापर केला जात असताना अशी शक्यता फारच कमी आहे. त्यामुळं मुली, महिलांना बेडवर झोपण्यास मनाई करणं यात काहीही तथ्य नाही.

  हे वाचा - खळबळजनक! 5 दिवसांत 100 लहान मुलं MIS-C च्या विळख्यात; पालकांनो वेळीच ओळखा लक्षणं

  अशा काही जुन्या रुढी परंपरा अद्याप सुरु आहेत. मात्र त्याकाळी त्यामागे असणारी कारणं आता उरलेली नाहीत. तसंच मासिक पाळीही नैसर्गिक प्रक्रिया असल्यानं स्त्रियांना या काळात वेगळी वागणूक देणं, त्यांच्यावर चुकीच्या परंपरा पाळण्यास दबाव आणणं बंद होणं आवश्यक आहे. यासाठी महिलांनी, मुलींनी पुढाकार घेऊन हे गैरसमज योग्य स्पष्टीकरण देऊन दूर केले पाहिजेत. तर मासिक पाळी म्हणजे संकट वाटणार नाही.

  First published:
  top videos

   Tags: Health, Lifestyle, Period, Woman