• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोना नव्हे तर लॉकडाऊनमुळेच होतील जास्त मृत्यू; तज्ज्ञांनी केलं सावध

कोरोना नव्हे तर लॉकडाऊनमुळेच होतील जास्त मृत्यू; तज्ज्ञांनी केलं सावध

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्याशी बातचित करताना आरोग्य तज्ज्ञांनी (health expert) ही शक्यता वर्तवली आहे. 

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 मे : कोरोनाव्हायरसचं (coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. मात्र कोरोनापेक्षा हा लॉकडाऊनच सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीबाबत जगातील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ आशिष झा (Asish Jha) आणि जोहान गिसेक (Prof. Johan Giesecke) यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी लॉकडाऊन हळूहळू शिथील करून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. प्राध्यापक जोहान म्हणाले, "आजारापेक्षा लॉकडाऊन सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरू शकतं. यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही उद्धवस्त होईल. कोरोनाव्हायरस हा सौम्य असा आजार आहे. बहुतेक लोकांना माहितीही नाही की त्यांना कोरोनाव्हायरस झाला आहे. ज्यांना आधीपासून इतर आजार आहे, त्यांनी या आजारापासून बचाव करायला हवा. आजाराच्या तुलनेत कठोर लॉकडाऊनच्या कारणाने अधिक मृत्यू होऊ शकतात" हे वाचा - 31 मेनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार? असा असेल सरकारचा नवा प्लॅन "लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवायला हवा. सुरुवातीला काही बंधनं हटवावीत. जर संक्रमण जास्त पसरलं तर पुन्हा एक पाऊल मागे जावं. वयस्कर आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांची विशेष काळजी घ्यायला हवी", असा सल्ला जोहान यांनी दिला. तर हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्युटचे आशीष झा यांनी सांगितलं, "कोरोनाव्हायरस पुढील वर्षापर्यंत तरी राहणारा आहे आणि लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था सुरू करताना लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे." "या व्हायरसचा मानसिक प्रभावही आहे. लॉकडाऊन लागू करून तुम्ही लोकांना परिस्थिती खूप गंभीर आहे, हे जाणवून देता. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही अर्थव्यवस्था सुरू करता तेव्हा तुम्हाला लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो", असं झा यांनी सांगितलं. हे वाचा - खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार का नाही? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला दोघांशी बातचीत करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "लोकांचं जीवन आता बदलणार आहे. अमेरिकेत 11 सप्टेंबर, 2001 च्या    दहशतवादी हल्ल्याला अध्याय म्हटलं जातं. मात्र कोविड-19 पूर्ण पुस्तक असेल. भारताला कोरोनाव्हायरसशी प्रभावीपणे लढा देण्यासाठी राज्यांना अधिक अधिकार आणि संसाधने उपलब्ध करून द्यावी लागतील" संकलन, संपादन - प्रिया लाड कोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं
  Published by:Priya Lad
  First published: