शास्त्रज्ञांनी तयार केलं खास Inhaler; कोरोनाव्हायरसशी देणार टक्कर

शास्त्रज्ञांनी तयार केलं खास Inhaler; कोरोनाव्हायरसशी देणार टक्कर

हे Inhaler कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांशी सामना करू शकतं.

  • Share this:

ब्रिटन, 27 मे : कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लसीचं ट्रायल जगभरात सुरू आहे. ही लस कधी येईल अद्याप माहिती नाही. मात्र कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरूच आहेत. आता शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी एक खास इनहेलर (inhaler) विकसित केलं आहे. हे इनहेलर कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांशी सामना करू शकतं.

ब्रिटिश कंपनी सिनायर्जनने हे इनहेलर तयार केलं आहे, ज्याचं नाव आहे SNG001 इनहेलर. या इनहेलरचं सध्या ट्रायल सुरू आहे. SG016 नावाच्या ट्रायलमध्ये सुरुवातीला रुग्णालयात 98 रुग्णांवर याचं ट्रायल घेण्यात आलं आहे. जो सकारात्मक दिसून आला आहे आणि त्याचा पूर्ण परिणाम लवकरच दिसून येईल. शिवाय ट्रायलमध्ये आता 220 रुग्णांचा समावेश आहे. ज्यांच्यामध्ये लक्षणं दिसल्यानंतर तीन दिवसांच्या आत हे इनहेलर त्यांना दिलं जाईल.

हे वाचा - तुमचं 'हे' बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा

सिनायर्जनचे सीईओ रिचर्ड मार्डसन यांनी सांगितलं की, "SG016 ट्रायलच्या विस्ताराने आपण खूप आनंदी आहेत. यामुळे आपल्याल लवकरच घरगुती वातावरणा ड्रग टेस्ट करण्याक यशश्वी होऊ शकतो.  आम्हाला या ट्रायलमधून खूप आशा आहेत. जर हे ट्रायल यशस्वी झालं तर कोरोनामुळे फुफ्फुस आणि श्वसनप्रणालीवर होणाऱ्या परिणामांपासून आपण शरीराला वाचवू शकतो"

इनहेलर हे प्राकृतिक प्रोटिन इंटरफेरॉन बीटाला (आईएफएन-बीटा) थेट फुफ्फुसामध्ये सोडतं. हे प्रोटिन शरीरातील अँटिव्हायरल प्रतिक्रियांना टार्गेट करतं. फक्त पेशींना हानी पोहोचण्यापासून रोखत नाही, तर व्हायरससला नकल करण्यापासूनही रोखतं.

हे वाचा - धक्कादायक परिणाम! कोरोनाची पहिली लस दिलेला तरुण आधी झाला बेशुद्ध मग...

जगभरात पसरलेल्या महासाथीत हे इनहेलर खूप महत्त्वाची भूमिका बजावेल असा दावा कंपनीने केला आहे. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर सर्व नागरिकांना हे इनहेलर उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

कोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

First published: May 27, 2020, 1:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या