वीरेंद्र भारद्वाज/शिमला, 20 एप्रिल: सध्या मास्क (Mask) हा दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा असा एक मास्क झाला आहे. बाजारात तसे बरेच मास्क आहेत. पण लोकांना पुन्हा वापरता येईल अशा मास्ककडे जास्त कल आहे. काही मास्क विशिष्ट कालावधीत पुन्हा वापरून ते नंतर टाकून द्यावे लागतात. तर काही मास्क धुवून धुवून पुन्हा वापरता येतात. पण अशा मास्कचा प्रभावही नंतर कमी होतो. पण आता संशोधकांनी असा मास्क तयार केला आहे. जो धुण्याची गरज नाही. न धुताच तुम्हाला तो मास्क पुन्हा पुन्हा वापरता येईल.
हिमाचल प्रदेशमधील आयआयटी मंडीच्या (IIT Mandi) संशोधकांनी असा फॅब्रिक मास्क तयार केला आहे, जो तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला हा मास्क धुण्याची गरज नाही. मास्क थोडा वेळ तीव्र उन्हात ठेवला तरी त्यावरील कोरोनाव्हायरस आपोआप नष्ट होईल आणि मास्क पुन्हा वापरता येईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा मास्क धुवूसुद्धा शकता. हा मास्क तयार करण्यासाठी पॉलिकॉटन फॅब्रिकचा वापर करण्यात आलं आहे.
आयआयटी मंडीच्या स्कूल ऑफ बेसिक सायन्सेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित जायसवाल यांच्यासह प्रवीण कुमार, शौनक रॉय आणि अंकिता सकरकर यांनी हा मास्क तयार केला आहे.
हे वाचा - BREAKING! आता 18+ व्यक्तींना मिळणार CORONA VACCINE! PM मोदींचा मोठा निर्णय
डॉ. अमित यांनी सांगितलं, "सध्या फेस मास्क दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाह आहे. लोकांना नवीन नवीन मास्क खरेदी करावा लागतो. दररोज किती तरी मास्क वापरला जातात. यामुळे कचराही वाढतो आहे आणि वापरलेले मास्क फेकल्याने व्हायरस पसरण्याचाही धोका आहे. या सर्वाचा विचार करून कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त टिकेल आणि सुरक्षा देईल असा मास्क आम्हाला तयार करायचा होता. आम्ही असा मास्क तयार केला"
"आम्ही तयार केलेला मास्क पूर्णपणे सुरक्षित आहे. उन्हात ठेवल्यानंतर तो पुन्हा वापरता येऊ शकतो. तुम्ही साबणाने 60 वेळा जरी हा मास्क धुतला तरी तो सुरक्षित असेल आणि व्हायरसला रोखण्यास प्रभावी असेल. हा मास्क वापरताना श्वास घेतानाही काही त्रास होणार नाही", असं डॉ. अमित यांनी सांगितलं.
हे वाचा - सावधान! कोरोनापासून बचाव करताना तुम्ही गंभीर आजाराला निमंत्रण तर देत नाहीयेत ना?
हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटीच्या अप्लाइड मटेरिअल्स अँड इंटरफेसेज जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mask