काही लोकांना बडबड करायला खूप आवडते. यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असते. बोलणे किंवा बडबड करणे काही चुकीचे नाही. पण शांत बसणाऱ्या लोकांना याचे काही फायदे होतात. हे तुम्हाला माहिती आहे का?
शांत बसणाऱ्या लोकांना त्यांच्या या स्वभावाचा काही अंशी फायदाच होतो. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले. आज आम्ही तुम्हाला गप्प बसण्याचे आपल्या आरोग्याला काय काय फायदे होतात याबद्दल माहिती देणार आहोत.
2/ 7
गप्प बसणं म्हणजे सक्तीचं मौनव्रत करणं असं नाही तर कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण टाळून, आवाज आणि दारूपासून दूर राहून स्वतःला शांत ठेवा. याशिवाय अनावश्यक संभाषण टाळणे. चला पाहुयात गप्प बसण्याचे फायदे.
3/ 7
एबीपी माझामध्ये दिलेल्या माहितीनुसार, अधिक आवाज किंवा ध्वनी प्रदूषण असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाब वाढताना दिसतो, तर जे लोक शांत ठिकाणी राहतात. त्यांना बीपीचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.
4/ 7
जे लोक शांत राहतात त्यांच्या मनही शांत राहते, यामुळे त्यांची एकाग्रताही चांगली असते. ते आपल्या कामात किंवा अभ्यासात सहज लक्ष केंद्रित करतात. त्यांचे विचारही स्थिर राहतात.
5/ 7
शांत राहण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, त्यांच्या मेंदूची वाढ चांगली होते. अशा लोकांची समजून घेण्याची, विचार करण्याची क्षमता आणि आकलनशक्ती चांगली असते.
6/ 7
जास्त आवाज असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढू शकते आणि यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा धोका असतो. शांत ठिकाणी शांत राहिल्याने या हार्मोनवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
7/ 7
शांत राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, मेंदू योग्यरित्या सक्रिय राहतो. तेव्हा त्याला चांगली झोप लागते. कोणत्याही प्रकारचा मानसिक विकार होण्याचा धोका कमी होतो.