मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Oversleeping : जास्त झोपल्याने खरंच मधुमेह होतो का? सत्य वाचाल तर उडेल तुमची झोप!

Oversleeping : जास्त झोपल्याने खरंच मधुमेह होतो का? सत्य वाचाल तर उडेल तुमची झोप!

आपल्या आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे, परंतु जर आपण आवश्यकतेपेक्षा जास्त झोपू लागलो तर त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया जास्त झोपण्याचे काय तोटे आहेत.

आपल्या आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे, परंतु जर आपण आवश्यकतेपेक्षा जास्त झोपू लागलो तर त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया जास्त झोपण्याचे काय तोटे आहेत.

आपल्या आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे, परंतु जर आपण आवश्यकतेपेक्षा जास्त झोपू लागलो तर त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया जास्त झोपण्याचे काय तोटे आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च : जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो तेव्हा डॉक्टर चांगली झोप घेण्याचा सल्ला देतात. एवढेच नाही तर शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर रात्री झोपून शरीर स्वतःला बरे करण्याचे काम करते. या फायद्यांदरम्यान जर आम्ही तुम्हाला सांगितले की, झोपेमुळे तुम्ही आजारीदेखील पडू शकता किंवा तुमचा जीवही जाऊ शकतो तर? तुमच्यासाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक असेल. मात्र हे खरं आहे.

WebMD च्या मते, जर तुम्ही जास्त झोपत असाल तर त्यामुळे मधुमेह, हृदयविकार इत्यादी वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात. संशोधनात असेही आढळून आले आहे की, जर तुम्ही जास्त झोपू लागलो तर तुम्ही डिप्रेशन किंवा मानसिक आजाराला बळी पडू शकता. चला जाणून घेऊया जास्त झोपल्याने आरोग्याला काय नुकसान होऊ शकते.

जास्त झोपल्याने होऊ शकतात हे त्रास

मधुमेह : संशोधनात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही गरजेपेक्षा कमी किंवा गरजेपेक्षा जास्त झोपलात तर त्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.

लठ्ठपणा : संशोधनात हेदेखील आढळले की, जर तुम्ही दररोज 9 ते 10 तास झोपले तर त्यानंतरच्या 6 वर्षांत 21 टक्के लोक लठ्ठ होऊ शकतात.

डोकेदुखी : जर तुम्ही वीकेंड्सला किंवा दररोज जास्त काळ झोपत असाल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मेंदूतील सेरोटोनिनचे प्रमाण वाढल्याने किंवा कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवते.

नैराश्य : ज्याप्रमाणे निद्रानाशामुळे नैराश्याची तक्रार सुरू होते, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्यासही नैराश्य येऊ शकते. जगातील 15 टक्के लोक जास्त झोपेमुळे नैराश्याने ग्रस्त आहेत.

हृदयरोग : एका संशोधनात असे आढळून आले की, 9 ते 11 तास झोप घेणाऱ्या 38 टक्के महिलांना इतर महिलांच्या तुलनेत कोरोनरी हार्ट डिसीजची समस्या असते.

मृत्यूची शक्यता : असे आढळून आले आहे की जे लोक रात्री 9 ते 11 तास झोपतात, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. जास्त झोपेमुळे मानसिक आणि शारीरिक आजार होतात त्यामुळे ही परिस्थिती ओढवते.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Sleep