बॉलिवूड मधे अनेक चित्रपटांचे सिक्वेल सध्या पहायला मिळत आहेत. पण बहूतेकदा पहिल्या चित्रपटातील कलाकार हे दुसऱ्या चित्रपटात नसतात. तर विशेषता अभिनेत्रींना बदललं जात. पण अभिनेते मात्र तेच असतात. काही वेळेस अभिनेत्रींच्या इतर कामांच्या तारखांमुळे तर कधी त्यांना दुसऱ्या चित्रपटासाठी विचारलं जात नाही. याची अनेक उदाहरणे बॉलिवूड मधे पहायला मिळतात.
लारा दत्ता 2010 साली आलेल्या हाऊसफूल या चित्रपटात दिसली होती. रितेश देशमुख सोबत तिने काम केल होत. पण त्यानंतर आलेल्या हाऊसफूल सिरीज मधे ती दिसली नाही.
मुकेश भट्ट यांच्या थ्रिलर मर्डर या चित्रपटात मल्लिका शेरावत झळकली होती. तिचा बोल्ड अंदाज सगळ्यानांच भावला होता. पण मर्डर 2 मधे तिला रिप्लेस करण्यात आलं. व जॅकलिन फर्नान्डीज ची वर्णी तिच्या जागी लागली.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही हाऊसफूल चित्रपटाचा महत्त्वाचा चेहरा होती. तर हाऊसफूलच्या तीन सिरीज मधे ती दिसली होती पण चौथ्या चित्रपटाचून मात्र तिला वगळण्यात आलं. होत.
रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल रिटर्णस या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूरच्या कामाची विशेष दखल घेण्यात आली होती. तिचा परफॉर्मन्स हिट ठरला होता. त्यानंतरच्या गोलमाल 3 मधे ती होती पण नंतर आलेला गोलमाल 4 मधे ती दिसली नाही. तर अभिनेता अजय देवगन मात्र कायम होता.
अभिनेत्री क्रिती सेनन ने हिरोपंती या चित्रपटातून पदार्पण केलं होत. टायगर क्रितीची जोडी हिट ही ठरली होती. तर आता हिरोपंतीचा सिक्वेल येत आहे. पण क्रिती ला मात्र त्यातून वगळण्यात आलं आहे. तर टाटगर सोबत तारा सुतारीया दिसणार आहे.
हाऊसफूल चित्रपटातच अभिनेत्री दीपिका पदुकोण होती. 2010 साली आलेला हा चित्रपट हिट ठरला होता. पण 2010 साली याच चित्रपटाच्या सिक्वेल मधे ती दिसली नाही. तर तिच्यासोबत काम करणारा अक्षय कुमार मात्र सिक्वेल मधे होता.
2016 साली आलेल्या छम-छम या बागी चित्रपटातील गाण्यावरील अभिनेत्री श्रद्धा कपूर चा परफॉर्मन्स हीट ठरला होता. तर टायगर श्रॉफ सोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. पण त्यानंतर आलेल्या बागी च्या सिक्वेल मधे श्रद्धाला ला रिप्लेस करण्यात आलं. पण टायगर मात्र त्यात दिसला होता.