• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अरे यांना कुणीतरी आवरा! घाई म्हणून चक्क ट्रकखालूनच बाईक नेली; चालकाचा प्रताप VIRAL

अरे यांना कुणीतरी आवरा! घाई म्हणून चक्क ट्रकखालूनच बाईक नेली; चालकाचा प्रताप VIRAL

ट्रकखालून जाणाऱ्या बाईकचा हा व्हिडीओ पाहून काहींना हसू आलं आहे तर काही जणांनी चिंता व्यक्त केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 07 एप्रिल: सध्या धकाधकीच्या जीवनशैलीत तसा फारसा वेळ कुणालाच नाही. मग ते ड्रायव्हिंग करतानाही का असेना. कित्येक जण तर या घाईत वाहतुकीच्या नियमांचंही उल्लंघन करताना दिसतात. काही काही जण तर काय करतील याचा नेम नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये चक्क ट्रकखालूनच बाईक नेण्यात आली आहे. हेव्ही ड्रायव्हर म्हणून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. @itz saini vimal इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो पाहून सुरुवातीला हसायलाच येईल पण हृदयाचा ठोकाही चुकेल.
  व्हिडीओत पाहू शकता एक भलामोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. पादचारी या उभ्या ट्रकच्या खालूनच जाताना दिसत आहे. त्यांना जाताना पाहून मग बाईक चालकसुद्धा ट्रकखालून जाण्याचा प्रयत्न करतात. स्वतःसह बाईकलाही ट्रकखालून नेतात. हे वाचा - तरुणाचा पाय तोंडात धरला आणि...; बिबट्याने केलेल्या भयंकर हल्ल्याचा VIDEO VIRAL सुरुवातीला एक बाईकचालक असा प्रताप करतो. मग काय त्याच्या मागील बाईकचालकसुद्धा त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत पुढे जातात. या एका बाईकचालकाच्या मागे असे आणखी काही बाईकचालक दिसतात जे या ट्रकखालून जाण्याच्या तयारीत आहेत. जसं रेल्वेफाटक क्रॉस करावं, तसेच हे पादचारी आणि बाईकचालक ट्रक क्रॉस करत आहेत. हे वाचा - खतरनाक! फ्लिप करत तरुणाने केला असा स्टंट; VIDEO पाहून तुम्हाला येईल चक्कर हा व्हिडीओ पाहून आणि बाईकचालकाने लावलेलं डोकं पाहून अनेकांना हसू आवरत नाही आहे. हा व्हिडीओ मजेशीर व्हिडीओ म्हणून व्हायरल होतो आहे. तर काही जणांनी मात्र याबाबत चिंतासुद्धा व्यक्त केली आहे. असं काही कारणं हे संकटापेक्षा कमी नाही. असा प्रताप जीवावरसुद्धा बेतू शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्ही तरी शहाणे व्हा. असा काही वेडेपणा करू नका हीच विनंती. कारण अति घाई संकटात नेई हे कायम लक्षात ठेवा.
  Published by:Priya Lad
  First published: