Home /News /lifestyle /

तरुणाचा पाय तोंडात धरला आणि...; बिबट्याने केलेल्या भयंकर हल्ल्याचा VIDEO VIRAL

तरुणाचा पाय तोंडात धरला आणि...; बिबट्याने केलेल्या भयंकर हल्ल्याचा VIDEO VIRAL

बिबट्याचा (Leopard) हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर अक्षरश: काटा येईल.

    श्रीनगर, 07 एप्रिल : सोशल मीडियावर (Social media) जंगली प्राण्यांचे (Animal video) शिकारीचे तसे बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. जंगलात या प्राण्यांना प्राण्यांची शिकार करताना तुम्ही पाहिलं आहे. ते पाहूनच अंगावर अक्षरश: काटा येतो. मग विचार करा जर हे प्राणी माणसांवर हल्ला करताना दिसले तर आपलं काय होईल. असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका बिबट्याने (Leopard) एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. जम्मूच्या (Jammu) गांधीनगरमधील (Gandhi Nagar) ग्रीन बेल्ट पार्कचा (Green Belt Park) व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये  बिबट्याने पार्कमध्ये बसलेल्या एका व्यक्तीवर हल्ला केला. बिबट्याने इतक्या भयंकर पद्धतीने त्या व्यक्तीवर अटॅक केला आहे जो पाहूनच पाहूनच धडकी भरेल. एएनआयने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक गाडी उभी आहे आणि त्याच्याजवळ दोन व्यक्ती. त्यापैकी एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे. त्या व्यक्तीचा सुरुवातील त्याने पाय धरला आणि त्याला जमिनीवर पाडलं. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीचा पाय धरला. त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने बिबट्यावर काठीने हल्ला केला. त्याला तिथून पळवण्याचा प्रयत्न केला. बिबट्या तिथून पळतोसुद्धा. तेव्हा या दोन्ही व्यक्ती लगेच आपल्या गाडीत बसतात. पण बिबट्या काही दूर पळून जातो असं नाही. तो पुन्हा त्यांच्या गाडीमागे धावत येतो. हे वाचा - पक्ष्यांसाठी हाताऐवजी तोंडात धरले चिप्स, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही व्हिडीओ पाहताच आपल्याला घाम फुटतो, हृदयाची धडधड वाढते. विचार करा त्या दोघांचं तिथं काय झालं असेल. तिथं आणखी काही लोकसुद्धा उपस्थित होते. जे ही सर्व घटना कुंपणाबाहेरून प्रत्यक्षात पाहत होते. शिवाय वन्यजीव विभागाचे कर्मचारीही तिथं असल्याचं सांगितलं जातं आहे. तेसुद्धा या दोघांना बिबट्यापासून वाचवण्याच्या तयारीत होते. पण दोघंही गाडीत पुन्हा बसल्यानंतर त्यांनाही थोडं हायसं वाटलं. हे वाचा - VIDEO - आता माझी सटकली! रिकामं भांडं पाहून भुकेला कुत्रा मालकासमोर गेला आणि... माहितीनुसार या व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली नाही. शिवाय दोघंही लगेच गाडीत बसल्याने त्यांचा जीवही वाचला आहे. आता वनविभागामार्फत  या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Attack, Jammu and kashmir, Leopard, Shocking viral video, Social media viral, Srinagar, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या