मुंबई, 06 एप्रिल : जगात अशा काही व्यक्ती असतात जे अशक्यही शक्य करून दाखवतात. खतरनाक असे स्टंट (Stunt) करून सर्वांना हैराण करतात. सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण असे डेंजर स्टंट (Stunt video) करत असतात. त्यापैकी काही जणांचे अयशस्वी होतात, तर काही जणांना गंभीर दुखापत होता, काही जणांच्या जीवावरही बेततं. पण मोजकेच लोक यात यशस्वी होताना दिसतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आयपीएस ऑफिसर दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'जोपर्यंत काही पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्वकाही अशक्यच वाटतं', असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
Everything seems impossible until it's done.#MondayMotivation
Note - Never try this. (Especially without safety gears) pic.twitter.com/gt8080cA4m — Dipanshu Kabra (@ipskabra) April 5, 2021
व्हिडीओत पाहू शकता हा तरुण फ्लिप करत असतो. पुढे दोन खुर्च्या समोरासमोर ठेवल्या आहेत आणि त्यावर एका बॉक्समध्ये पाणी ठेवलं आहे. सुरुवातीला हातावर फ्लिप करत जाणारा हा तरुण खुर्चीवर जातात पाठीतून फ्लि करतो त्यावेळी त्याचं डोकं पाणी भरलेल्या बॉक्समध्ये जातं. त्याचे केस ओले होतात आणि त्यानंतर तशीत फ्लिप करत तो दुसऱ्या बाजूला येतो आणि तिथं उभा राहतो.
हे वाचा - पक्ष्यांसाठी हाताऐवजी तोंडात धरले चिप्स, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही
तरुण जेव्हा त्या खुर्च्यांजवळ जातो तेव्हा त्याची काय अवस्था असेल माहिती नाही. खरंतर व्हिडीओत तरी तो तसा अगदी बिनधास्त दिसतो आहे. पण व्हिडीओ पाहताना आपल्या हृदयाची धडधड मात्र वाढते. आता काय होईल आणि काय नाही, असंच काहीसं होतं. या तरुणाचं डोकं त्याच बॉक्सवर किंवा खुर्चीवर आपटलं असतं. थोडा जरी त्याचा अंदाज चुकला असता तरी त्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. पण सुदैवानं तसं होत नाही.
हे वाचा - आधी जमिनीवर आपटलं नंतर...; 82 वर्षीय आजोबांनी चोराला कशी घडवली अद्दल पाहा VIDEO
हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. लोक हैराण झाले आहे. अनेकांनी हे किती कठीण आहे, असं करण्याची गरज काय आहे, असंच म्हटलं आहे. शिवाय व्हिडीओ शेअर करणाऱ्या काबरा यांनीसुद्धा हा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्लासुद्धा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Stunt video