जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mango Season : मधुमेह असलेल्या लोकांसाठी आंबा खाणे सुरक्षित आहे का?

Mango Season : मधुमेह असलेल्या लोकांसाठी आंबा खाणे सुरक्षित आहे का?

Mango Season : मधुमेह असलेल्या लोकांसाठी आंबा खाणे सुरक्षित आहे का?

आंब्यामध्ये (Mango) नैसर्गिक साखर असते हे लक्षात घेता, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ते खाणे मधुमेह असलेल्या लोकांसाठी योग्य नाही.

    मुंबई, 18 मे : उन्हाळा (Indian Summers) बहुतांश जणांचा नावडता ऋतू असला, तरी त्यातली एक गोष्ट मात्र बहुतांश जणांना आवडते. ती गोष्ट म्हणजे (Mango) आंबा. फळांच्या या राजाची लोकप्रियता (King of Fruits) केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आहे. वेगवेगळ्या चवीचे आंबे हा खरं तर संशोधनाचा विषय आहे आणि तितकाच तो आस्वादाचा विषय आहे. हापूस आंब्याचा (Alphonso Mango) थाट निराळाच असला, तरी पायरी, केशर, लंगडा, दशहरी, गोवा मानकूर आणि वैविध्यपूर्ण चवीचे रायवळ आंबे सर्वांना आवडतात. आंब्याची चव वेड लावणारी आणि सगळं काही विसरायला लावणारी असते. आंब्यात पोषणमूल्यंही (Nutrients) भरपूर असतात. आंबा हे गोड फळ असल्याने साहजिकच त्यात नैसर्गिक साखरेचं (Natural Sugards) प्रमाण जास्त असतं. म्हणूनच डायबेटीस (Diabetes) अर्थात मधुमेह असलेल्या व्यक्तींना आंबे खाणं हितावह नसतं, असं समजलं जातं. काही प्रमाणात ते खरंही आहे; पण त्याबद्दल विज्ञान नेमकं काय सांगतं? डायबेटीस असलेल्यांनी खरंच आंबे खाऊ नयेत का, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ही गोष्ट खरी आहे, की आंब्यात भरपूर कॅलरीज (Calories) आहेत. त्या कॅलरीज अर्थात नैसर्गिक साखरेतूनच येतात आणि त्यामुळे आंबे खाणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढू शकतं. अर्थात, त्याचबरोबर आंब्यात अनेक प्रकारची व्हिटॅमिन्स (Vitamins) आणि खनिजंही (Minerals) असतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आंब्यामध्ये तंतुमय पदार्थ अर्थात फायबर्स (Fibres) आणि विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स (Anti Oxidants) मोठ्या प्रमाणात असतात. अमेरिकेतल्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेच्या म्हणण्यानुसार, फायबर्समुळे रक्तातल्या साखरेचा एकंदर परिणाम कमी केला जातो. म्हणजेच डायबेटीस नियंत्रित करण्यासाठी फायबर्सचा उपयोग होऊ शकतो. तसंच, रक्तात साखर शोषली जाण्याचा वेग कमी करण्याचं कामदेखील फायबर्स करतात. त्याचसोबत नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन या संस्थेचा निष्कर्ष सांगतो, की रक्तातल्या साखरेची पातळी वाढण्याशी निगडित असलेला ताण कमी करण्याचं काम आंब्यातले अँटीऑक्सिडंट्स करतात. त्यामुळे आंब्यातले फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स अशा रीतीने डायबेटीस पेशंट्सना उपयोगी ठरू शकतात.

    शरीरावरील एका छोट्याशा तिळाने वाचवला मॉडेलचा जीव; भयंकर आजाराचं वेळीच झालं निदान

     पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index). कोणत्याही पदार्थांचा रक्तातल्या साखरेवर किती परिणाम होतो, हे मोजण्यासाठी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) वापरला जातो. एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जेवढा जास्त, तेवढा तो पदार्थ रक्तातली साखर वाढवणारा, म्हणजेच डायबेटीस पेशंट्सना न चालणारा असतो. 0 ते 100 या प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स मोजला जातो. 55 किंवा त्यापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी समजला जातो. 56 ते 69 हा मध्यम, तर 70 आणि त्यापेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स उच्च समजला जातो. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स केवळ 51 आहे. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या आंबा हे Low GI Food म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेलं फळ आहे.

    सगळीकडे व्हायरल होणाऱ्या Black Hole च्या फोटोमागचं सत्य माहितीय का? या सगळ्यातून असा निष्कर्ष काढता येऊ शकतो, की डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी आंबा पूर्णपणे वर्ज्य करण्याची गरज नाही. अर्थात, डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी मनसोक्त ओरपून आंबे खाऊ नयेत हेही तितकंच खरं; पण दिवसाला एखाद-दोन फोडी खाण्यास हरकत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तत्त्व लक्षात घेतलं, तर प्रत्येक व्यक्तीवर आंब्याचा वेगळा परिणाम होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या जेवणात डायबेटिक पेशंट आंबा खाणार असतील, त्या जेवणापूर्वी आणि नंतर अशा दोन्ही वेळा त्यांनी ब्लड शुगर टेस्ट (Blood Sugar Test) करावी. त्यातून आंब्यामुळे त्यांची ब्लड शुगरवर किती प्रमाणात वाढतेय, ते कळेल. त्यावरून त्यांना आंबा खावा की नाही आणि खाल्ला तर किती प्रमाणात खावा याचा अंदाज येऊ शकेल. डायबेटिक व्यक्तींना आंब्याकडे सरसकट पाठ फिरवण्याची गरज नाही, असा याचा अर्थ.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात