Home /News /lifestyle /

खतरनाक! आधी पकडून जमिनीवर आपटलं, नंतर...; 82 वर्षीय आजोबांनी चोरट्याला कशी घडवली अद्दल पाहा VIDEO

खतरनाक! आधी पकडून जमिनीवर आपटलं, नंतर...; 82 वर्षीय आजोबांनी चोरट्याला कशी घडवली अद्दल पाहा VIDEO

या चोरट्या मुलावर आजोबा चांगलेच भारी पडले आहेत.

    वॉशिंग्टन, 05 एप्रिल : वय झालं म्हणून वयस्कर व्यक्तींना अनेकदा कमजोर समजलं जातं. या व्यक्ती आपल्याला विरोध करू शकणार नाहीत, आपल्याला प्रतिकार करू शकणार नाही, घाबरतील असं समजून बहुतेक चोरटे याचा फायदा घेतात. वयस्कर व्यक्तींना लक्ष्य करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका मुलाने एका आजोबांची कार पळवण्याचा प्रयत्न केला पण आजोबांनीसुद्धा त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. अमेरिकेच्या एटलांटामधील ही घटना आहे. एका मुलाने 82 वर्षीय आजोबांची काळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हल्लासुद्धा केला. पण आजोबापण घाबरले नाहीत. त्यांनी त्या मुलाचा निर्भीडपणे सामना केला. त्यांनी या चोरट्यासोबत कशी फायटिंग केली ते तुम्हीच पाहा. इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, एटलांटा पोलिसांनी हा  व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओत पाहू शकता गॅस स्टेशनजवळ एक किशोरवयीन मुलगा कुणाचीतरी वाट पाहत असल्याचं दिसतं आहे. पण खरंतर तो कुणाची वाट पाहत नाही आहे, तर कार चोरी करण्याच्या विचारात आहे. हे वाचा - VIDEO - आता माझी सटकली! रिकामं भांडं पाहून भुकेला कुत्रा मालकासमोर गेला आणि... एका वयस्कर कारमालकाला हेरून तो त्याच्या जवळ जातो. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओत पाहू सकता. तो मुलगा वयस्कर व्यक्तीजवळ जाऊन त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसतो. त्यानंतर ती व्यक्ती कारचा दरवाजा खोलून कारमध्ये काहीतरी शोधते तेव्हा तो मुलगा त्याच्या पाठीमागे जातो आणि त्याच्या हातातून काहीतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. मुलगा या आजोबांकडून कारची चावी हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्यांच्या हातातील चावी घेऊन पळतो. पण आजोबापण काही कमी नाहीत. तेसुद्धा त्या मुलाचा पाठलाग करतात. चोराला धरून ते जमिनीवर आपटात, त्यावेळी तेसुद्धा पडतात. पण चोर पुन्हा उठतो आणि गाडीच्या दिशेनं पळत जाऊन कारमध्ये बसतो. हे वाचा - भरधाव ट्रेनसमोर डान्स करत होता, पुढे असं काही घडलं की...; VIDEO पाहून थक्क व्हाल पण ज्यावेळी आजोबा आणि त्या मुलामध्ये झटापट झालेली असते तेव्हा कार त्या आजोबांकडेच राहते. तो मुलगा कारमध्ये जाऊन बसतो खरा पण कार सुरू करण्यासाठी त्याच्याकडे चावीच नसते त्यामुळे तो कार सुरू करू शकत नाही. त्याचवेळी आजोबा दुसरीकडे मदत मागायलाही जाताना दिसता आणि तोपर्यंत तो मुलगा कार सोडून तिथून पळ काढतो. हा मुलगा फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या