लंडन, 06 ऑक्टोबर : कोणत्याही महिलेसाठी आई होण्याचा क्षण हा अविस्मरणीय असतो. नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझेरियन डिलिव्हरी प्रसूतीच्या ज्या काही वेदना असतात त्या ती महिला बाळाला पाहताच विसरते. एका आईने तर चक्क कोमात आपल्या बाळाला जन्म दिला आहे (Baby birth in coma) आणि कोमातून बाहेर येताच तिच्यासाठी हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं (Woman give birth to baby in coma). यूकेतील केल्सी राउट्स (Kelsie Routs) 28 आठवड्यांची प्रेग्नंट होती. तेव्हा तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत तिला कोरोना असल्याचं निदान झालं. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. महिलेच्या शरीराला आराम मिळावा म्हणून तिला मेडिकली इंड्युज्ड कोमात ठेवण्यात आलं. या प्रक्रियेमध्ये मेंदूला दुखापत होऊ नये म्हणून संबंधित रुग्णाला डॉक्टरांकडून कोमा स्टेटमध्ये ठेवलं जातं. यामध्ये डॉक्टरांकडून काही औषध दिलं जातं ज्यानंतर कोणत्याही संवेदना होत नाहीत. योग्य खबरदारी घेऊनच मेडिकल इंड्यूस्ड कोमाची प्रक्रिया पूर्ण केली जाते हे वाचा - VIDEO - पाऊटसाठी तरुणीने ओठांची वाट लावली; आता दाखवण्यालायकही राहिले नाही लिप्स द सन च्या रिपोर्टनुसार, केल्सी जेव्हा कोमात होती, तेव्हा डॉक्टरांनी इमर्जन्सी सिझेरिनय सेक्शनने तिची डिलीव्हरी केली. तिच्या प्रसूूतीच्या ठरलेल्या तारखेच्या 12 आठवडेआधीच तिची प्रसूती करण्यात आले. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर सात दिवसांनी ती कोमातून बाहेर आली. कोमातून बाहेर पडल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या हातात बाळ दिला. बाळाला पाहताच तिला धक्का बसला आणि खूप आनंद झाला. तीन मुलांची आई असलेल्या केल्सीने याला चमत्कार असल्याचं म्हटलं. डॉक्टरांनी माझा आणि माझ्या मुलीचा दोघींचा जीव वाचवला. माझ्यासाठी हा एक चमत्कार आहे. बाळ आणि आई दोघांची प्रकृती चांगली असून त्या दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे. हे वाचा - Shocking! हाणामारीत भयंकर फुटलं डोकं; तरुणाची निम्मी कवटी गायब आआधी अमेरिकेतील एका कोरोनाग्रस्त महिलेची कोमात डिलीव्हरी झाली होती. केल्सी टाउनसेंड या 32 वर्षीय महिलेनं गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर रोजी आपल्या चौथ्या अपत्याला जन्म दिला. पण त्यावेळी ती मेडिकली इन्ड्युस कोमात होती. त्यावेळी तिची प्रसूती करण्यात आली. तब्बल तीन महिन्यांनी तिने आपल्या बाळाला पाहिलं. 27 जानेवारी रोजी तिला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर तिनं पहिल्यांदा आपल्या बाळाला लुसीला जवळ घेतलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.