मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमचं कार्टं काही केल्या TV समोरून हटेना; हा VIDEO पाहा मिळेल आयडिया

तुमचं कार्टं काही केल्या TV समोरून हटेना; हा VIDEO पाहा मिळेल आयडिया

मुलांना बालपणातच शिस्तीचे धडे द्यायला हवेत. सकाळी लवकर उठणे, लवकर झोपणे, वेळेत अभ्यास करणे, स्वतःची कामं स्वतः करणे अशा सवयी मुलांना बालपणात लागल्या तर त्यांचा आयुष्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो.

मुलांना बालपणातच शिस्तीचे धडे द्यायला हवेत. सकाळी लवकर उठणे, लवकर झोपणे, वेळेत अभ्यास करणे, स्वतःची कामं स्वतः करणे अशा सवयी मुलांना बालपणात लागल्या तर त्यांचा आयुष्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो.

मुलांना टीव्हीपासून दूर ठेवायची ही एक सोपी ट्रिक.

8 मुंबई, 25  फेब्रुवारी : अरे दिवसरात्र त्या टीव्हीत (TV) डोळे घालून बसलेला असतो. जरा लांब तरी बस. नाहीतर डोळे फुटतील, मोठा भिंगाचा चष्मा लागेल इतक्या जवळून पाहशील तर... तुम्हीदेखील तुमच्या मुलांना सतत असं ओरडत असाल पण त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. ओरडल्यानंतर थोड्या वेळापुरते ते टीव्हीपासून दूर होतील पण अवघ्या काही मिनिटांतच हळूहळू टीव्हीच्या दिशेनं सरकतील. सांगून सांगून तुम्हाला वैताग आला असेल पण मुलांमध्ये काडीमात्र फरक दिसत नाही. आता यांचं करायचं तरी काय असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल.

मुलांच्या या सवयीला वैतागलेले तुम्ही एकटेच नाहीत तर ही समस्या जगभरातील पालकांची आहे. अशाच एका पालकानं यावर उत्तम असा उपाय शोधला आहे. एका वडीलांना आपल्या मुलाला टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी नेमका काय जुगाड केला तो तुम्हीच पाहा.

व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा बेडवर बसून टीव्ही पाहतो आहे. सुरुवातीला तो शिस्तीत टीव्हीपासून लांब बसला आहे. पण थोड्या वेळानं तो टीव्हीच्या अगदी जवळ येतो आणि बेडवर आडवा झोपून टीव्ही पाहण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात टीव्हीशेजारी असलेल्या माकडाच्या तोंडातून बबल्स बाहेर येतात. ज्यामुळे मुलाला टीव्ही पाहणं अशक्य होतं. तो गप्पपणे पुन्हा टीव्हीपासून दूर जातो आणि ज्या जागेवर बसून आधी तो टीव्ही पाहत होता. पुन्हा तिथंच जाऊन बसतो.

हे वाचा - भूत की आणखी काही? चिमुरडीचा हा VIDEO पाहून तुम्हाला फुटेल घाम

या मुलाच्या वडिलांना मुलाला टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. त्यांनी एका सेन्सर बसवला आहे. म्हणजे जेव्हा मुलगा टीव्हीच्या अगदी जवळ जाईल तेव्हा त्या सेन्सरवर समजतं आणि आपोआप त्या माकडाच्या तोंडातून बबल्स येता. व्हिडीओत आणखी एक छोटा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये मुलगा जेव्हा टीव्हीपासून लांब असतो तेव्हा त्याच्यावर ग्रीन लाइन्स दिसतात पण जेव्हा तो टीव्हीच्या जवळ येतो तेव्हा रेड लाइन्स दिसतात.

हे वाचा - धम्माल VIDEO: 'पावरी किधर हो रही है', पोलीसच विचारतायत हा प्रश्न!

हा व्हिडीओ पाहून मुलाच्या वडिलांचं बहुतेक पालकांनी कौतुक केलं आहे. असे बरेच जुगाड तुम्हाला तुमच्या मुलांच्याबाबतीही करता येऊ शकता.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Pictures viral, Small child, Tv, Viral