मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /3 महिने शी झाली नाही, तरुणाचा गेला जीव; रिपोर्ट पाहून डॉक्टरही झाले शॉक

3 महिने शी झाली नाही, तरुणाचा गेला जीव; रिपोर्ट पाहून डॉक्टरही झाले शॉक

लिंबू पाणी पाचनाची समस्या कमी करण्यात खूप मदत करतं. हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि पित्ताची निर्मिती वाढवतं. ज्यामुळे गॅस,बद्धकोष्ठता,अपचन यासारख्या समस्यांमध्ये दिलासा मिळतो.

लिंबू पाणी पाचनाची समस्या कमी करण्यात खूप मदत करतं. हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि पित्ताची निर्मिती वाढवतं. ज्यामुळे गॅस,बद्धकोष्ठता,अपचन यासारख्या समस्यांमध्ये दिलासा मिळतो.

सामान्य पोटदुखी, बद्धकोष्ठता म्हणून तरुण औषधं घेत राहिला आणि...

मुंबई, 29 एप्रिल : प्रत्येकाच्या शौचाची (Potty) सवय वेगवेगळी असते. कुणाला दररोज शौचाला (Poop) जाण्याची सवय असते, तर कुणाला एक दिवसाआडही. कधी कधी तुम्ही आजारी असाल आणि फार काही खाल्लं नसेल तर एक-दोन दिवसांपेक्षा जास्त दिवसही तुम्हाला शौचाला होत नाही. पण हे दिवस किती फार फार तर पाच दिवस पकडा. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल एका व्यक्तीला तब्बल 90 दिवस म्हणजे 3 महिने शौचाला झाली नाही (Man unable to poop for 3 months).

जॅझमिन डोनोवन या महिलेने आपल्या बॉयफ्रेंडची ही स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिचा बॉयफ्रेंड नॅथॅन प्रिचर्डचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याला तीन महिने पॉटी झाली नव्हती. त्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

जॅझमिनने सांगितलं, नॅथॅनच्या पोटात नेहमी दुखायचं. त्याला शौचालाही व्हायची नाही. जेव्हा जेव्हा तो डॉक्टरकडे जायचा. तेव्हा सामान्य पोटदुखी, बद्धकोष्ठता असल्याचं समजून डॉक्टर त्याला बद्धकोष्ठतेची औषधं देऊन घरी पाठवायचे. या औषधांनी सुरुवातीला त्याला पोटदुखीपासून आराम मिळाला. पण त्याला शौचाला काही होत नव्हतं. सलग तीन महिने त्याला पॉटी झाली नाही.

हे वाचा - बाबो! खऱ्या विमानापेक्षाही महाग आहे Airplane shaped bag; किंमत वाचूनच गार व्हाल

दररोज शौचाची सवय असणाऱ्यांना एखाद दिवस शौचाला झालं नाही की पोट अगदी जडजड झाल्यासारखं वाटतं. पण तीन महिने त्या रुग्णाचं काय झालं असेल याची कल्पना आपण करूच शकतो. त्याची प्रकृती गंभीर होत गेली. त्याचं वजन झपाट्याने कमी झालं. त्यानंतर त्याच्या पोटाचं स्कॅन करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या पोटात ट्युमर असल्याचं दिसलं. या ट्युमरने त्याच्या पोटातील मल रोखला होता.

सामान्य तपासणीत या ट्युमरचं निदान झालं नाही. त्यानंतर चाचणी केली असता हा ट्युमर कॅन्सरचा असल्याचं समजलं. नॅथॅनला बॉवल कॅन्सर (bowel cancer) म्हणजे पोटाचा कॅन्सर झाला होता. पोटाच्या कॅन्सरचं पहिलं लक्षण बद्धकोष्ठताच आहे. पण पुढे याचं रूप भयंकर होतं. पोटाच्या आतच रक्तस्राव होतो आणि शौचाला होत नाही. वजन कमी होणं, अशक्तपणा, पोटात वेदना अशा समस्या उद्भवतात. नॅथॅनच्या कॅन्सरचं निदान झालं तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याला वाचवणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा - एक्स बॉयफ्रेंडने ब्लॉक केल्याने भडकली महिला; बदला घेण्यासाठी केला नको तो प्रताप

आता नॅथॅनची गर्लफ्रेंड आणि त्याचं कुटुंब आता कॅन्सरबाबत जनजागृती करत आहेत. बॉवल कॅन्सर म्हणजे पोटाच्या कॅन्सरच्या जनजागृतीसाठी म्हणून तिने ही पोस्ट शेअर केली.

First published:
top videos

    Tags: Cancer, Health, Lifestyle, Stomach, Stomach pain