ब्रिटन, 29 एप्रिल : ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर बहुतेकांचं मन हे एक्सशी जोडलेलं असतं. म्हणतात ना किती काही झालं तरी पहिलं प्रेम विसरता येत नाही. मग तो एक्स-बॉयफ्रेंड (Ex boyfriend) दुकिंवा एक्स-गर्लफ्रेंड (Ex girlfriend) आपल्या दुसऱ्या नव्या जोडीदारासोबत दिसले तरी जीव जळतो आणि त्यांनी आपल्याला इग्नोर केलं तर मात्र तळपायाची आग मस्तकातच जाते. काही जण आपल्या या भावनांना कंट्रोल करतात. पण काही जण मात्र सुडाच्या भावनेनं पेटून उठतात. अशाच सुडाच्या भावनेनं पेटून उठली ती यूकेतील एक महिला. पण एक्स-बॉयफ्रेंडचा बदला घेण्याच्या नादात ती महिला स्वतःच अडचणीत सापडली.
50 वर्षांची हिलेरी वार्ड. तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला आपल्या सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यामुळे ती खूप संतप्त झाली होती. आपल्या एक्स बॉयफ्रेंडचा बदला घ्यायचाच असं तिने ठरवलं. तिला राग इतका अनावर झाला होता की तिने रागात भलतंच पाऊल उचललं. ज्याचा फटका उटल तिलाच बसला.
हिलेरीने तिचे आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे सेक्स व्हिडीओ यूट्युबवर अपलोड केले. इतकंच नव्हे तर दोघांचे खासगी फोटो आणि व्हिडीओ तिने एक्स बॉयफ्रेंडच्या कुटुंबाला पाठवले. त्याच्या वडीलांना प्रायव्हेट फोटो पाठवले तर त्याच्या मुलीला इन्स्टाग्रामवर प्रायव्हेट व्हिडीओ पाठवले.
हे वाचा - हा असा कसला आजार! हसता हसताच बेशुद्ध होते ही महिला
डेली मेलच्या रिपोर्टनुसार हिलेरीने त्याच्या मुलीला मेसेज केला आणि म्हणाली, तू पाहू शकते तुझ्या वडिलांच्या डोक्यात सतत काय सुरू असतं. तो एक निर्लज्ज माणूस आहे. माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे अनेक लोक तुझ्या वडिलांवर खूप हसत होते. संपूर्ण जग आता तुझ्या वडिलांचे कारनामे पाहू शकतं.
यूट्युबवरील पॉलिसीनुसार हिलेरीने टाकलेले सेक्स व्हिडीओ डिलीट करण्यात आले. तर हिलेरीच्या एक्सचे वडीलांनी भीतीने फोटो डिलीट केले. खासगी फोटो व्हायरल झाल्याने आपला मुलगा कोणतं टोकाचं पाऊल तर उचलणार नाही ना, अशी भीती त्यांना होती.
हे वाचा - भुकेला सिंह शिकारीसाठी पर्यटकांच्या गाडीकडे झेपावला आणि...; धडकी भरवणारा VIDEO
या प्रकरणात हिलेरीला अटक करण्यात आली. तिला प्रेस्टन कोर्टात हजर करण्यात आलं.हिलेरीचं हे कृत्य खूप लज्जास्पद असल्याचं कोर्टाने सांगितलं. ब्रिटनमध्ये रिवेंज पॉर्न कायदा लागू कारण्यात आला होता. त्यानुसरा एक्सचे सेक्स व्हिडीओ किंवा प्रायव्हेट फोटो लीक केल्याने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. पण हिलेरी वार्ड या शिक्षेतून सुटली. तिला तुरुंगवास झाला नाही. कम्युनिटी सर्व्हिस आणि अनपेड वर्कची तिला शिक्षा देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breakup, Lifestyle, Relationship, Uk