मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बाबो! खऱ्या विमानापेक्षाही महाग आहे ही Airplane shaped bag; किंमत वाचूनच गार व्हाल

बाबो! खऱ्या विमानापेक्षाही महाग आहे ही Airplane shaped bag; किंमत वाचूनच गार व्हाल

या विमानाच्या आकाराच्या बॅगेच्या (Airplane shaped bag) किमतीत खरंतर तुम्ही एक घर खरेदी करू शकता.

या विमानाच्या आकाराच्या बॅगेच्या (Airplane shaped bag) किमतीत खरंतर तुम्ही एक घर खरेदी करू शकता.

या विमानाच्या आकाराच्या बॅगेच्या (Airplane shaped bag) किमतीत खरंतर तुम्ही एक घर खरेदी करू शकता.

मुंबई, 29 एप्रिल : सध्या बाजारात तशा बऱ्याच बॅग (Bag) उपलब्ध आहे. अगदी लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत. विविध डिझाइनच्या बॅग तुम्ही पाहिल्या असतील. बहुतेकांना अशा हटके बॅग वापरायला खूप आवडतं. पण काही बॅग इतक्या विचित्र असतात की पाहायला त्या सुंदर वाटतात. पण त्या नेमक्या आहेत तरी कशासाठी असा प्रश्न पडतोच. त्यातही त्याची किंमत म्हणजे आश्चर्याचा मोठा धक्काच असतो.

सध्या अशाच एका बॅगेची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ही बॅग आहे विमानाच्या आकाराची (Airplane shaped bag). हुबेहुब विमानासारखी असलेली ही छोटीशी बॅग. आकाराने ही बॅग लहान असली तरी ती खऱ्या विमानापेक्षाही महाग आहे.

@saint या ट्विटवर युझरने या बॅगेचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टमध्ये बॅगेच्या फोटोसह त्याची माहितीही देण्यात आली आहे. विर्गिल अबलो द्वारा असलेली ही लुइस वुइटन फॉल/विंटर 2021 एयरलेन बॅग. असं त्यांनी म्हटलं आहे. याची किंमत 39 हजार डॉलर म्हणजे जवळपास 29 लाख रुपये आहे. हे ट्वीट व्हायरल झालं आणि त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

एका युझरने तर खऱ्या विमानाचा फोटो टाकला आहे आणि या किमतीत खरं विमान खरेदी करू शकतो, असं म्हटलं आहे.

हे वाचा - उपयोग काहीच नाही पण किंमत भारी! 67 हजार रुपयांना आहे ही एवढीशी Chair Bag

फोटोत शेअर करण्यात आलेलं विमान 1968 Cessna 150H सिंगल इंजिन प्लेन आहे. याची किंमत जवळपास 32 हजार डॉलर म्हणजे 23 लाख रुपये आहे. त्यानंतर ही बॅग पाहून त्यावर मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Airplane, Lifestyle, Viral, Viral photos