मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लुटूलुटू चालणाऱ्या पेंग्विनला कधी उडताना पाहिलंय का? पाहा हा दुर्मिळ VIDEO

लुटूलुटू चालणाऱ्या पेंग्विनला कधी उडताना पाहिलंय का? पाहा हा दुर्मिळ VIDEO

फोटो सौजन्य - बीबीसी व्हिडीओ ग्रॅब

फोटो सौजन्य - बीबीसी व्हिडीओ ग्रॅब

आकाश व्यापून टाकलेला पेंग्विनचा थवा (flying Penguins) तुम्ही पाहायलचा हवा.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 05 एप्रिल : पेंग्विन (Penguins) ज्यांना पंख तर असतात पण फार कधी त्यांना उडताना पाहिलं नाही. नेहमी आपल्याला ते बर्फात लुटूलुटू चालतानाच दिसले. पंख असूनही पेंग्विन का उडत (Penguins flying) नाही, असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडतो. पण पेंग्विनही उडू शकता. हो. अशाच उडणाऱ्या पेंग्विनचा (Flying Penguins) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे.

उडणाऱ्या पेंग्विनचा व्हिडीओ हा तसा दुर्मिळ म्हणालया हरकत नाही. बर्फाच्या कठड्यावरून पाण्यात डुबकी मारणारे किंवा पाण्यातून बाहेर येऊन बर्फात चालणारे पेंग्विन तुम्ही पाहिलेच आहेत.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला तुम्हाला पेंग्विनना चालताना दिसतील. थोडा धीर धरा आणि व्हिडीओ पूर्ण पाहा. काही वेळात पेंग्विन उडताना दिसतील. पाण्यापासून काही उंचावर हे पेंग्विन उडतात. हळूहळू ते इतके उंच जातात जणू जसे पक्षीच उडतात. असे एक-दोन नव्हे तर किती तरी पेंग्विन उडताना दिसतात. आकाशात हे पेंग्विन उंच भरारी घेतात. पेंग्विनचा थवा आकाशात उडताना दिसतो. संपूर्ण निळाशार आकाश हे पेंग्विन व्यापून टाकतात. थंड प्रदेशातील समुद्रावरून उडत उडत ते एका हिरव्यागार झाडांनी भरलेल्या अशा बेटावरही पोहोचतात.

हे वाचा - VIDEO - आता माझी सटकली! रिकामं भांडं पाहून भुकेला कुत्रा मालकासमोर गेला आणि...

बीबीसीचा हा व्हिडीओ लेफ्टनंट जनरल ज्ञान भूषण यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहताना इतकं छान वाटतं ना. पेंग्विनना आकाशात उडताना पाहून त्यांना जितका आनंद वाटत नसेल तितका आपल्याला वाटतो. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: Other animal, Viral, Viral videos