ब्रिटन, 27 फेब्रुवारी : एका मडक्यात अस्थी टाकून समुद्र किंवा नदीच्या पाण्यात त्याचं विसर्जन केलं जातं. पण एका मुलानं मात्र आपल्या वडिलांचं अस्थी विसर्जन अशा पद्धतीनं केलं ही तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यानं चक्क बिअर ग्लासमध्ये वडिलांच्या चितेची राख टाकून पबबाहेर त्याचं विसर्जन केलं आहे. यूकेमध्ये अशा विचित्र पद्धतीनं अस्थी विसर्जन करण्यात आलं आहे.
केव्हिन मॅकग्लिनचे (Kevin McGlinchey) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीचं विसर्जन अशा विचित्र पद्धतीनं करण्यात आलं. द होलीबश पबबाहेर त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का? तर ही त्यांची शेवटची इच्छा होती.
अनेकांची एक शेवटची इच्छा असते. त्यापैकी काही जणांना मृत्यूनंतर आपल्या अस्थींचं विसर्जन एका विशिष्ट ठिकाणी व्हावं असं वाटत असतं. अशीच इच्छा क्लेव्हिन यांचीही होती. त्यांनी आपली ही इच्छा आपल्या कुटुंबाला सांगितली आणि त्यांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली.
हे वाचा - घरात आग लागताच आईनं लेकरांना तिसऱ्या मजल्यावरून फेकलं आणि... धडकी भरवणारा VIDEO
केव्हिन यांचा मुलगा ओवेन आणि मुलगी कॅसिडी यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण केली. त्यांनी आपल्या वडिलांच्या अस्थी एका बिअर ग्लासमध्ये टाकल्या आणि त्यानंतर पबबाहेरील एका नाल्यात विसर्जित केल्यात. त्यांचं संपूर्ण कुटुंबं यावेळी उपस्थित होतं. ओवेन यांनी स्पीचही दिलं.
इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार ओवेन म्हणाला, तुम्हाला हा वेडेपणा वाटेल पण ही माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती. कॅसिडीनं सांगितलं, माझ्या वडिलांना हा पब खूप आवडायचा. ते इथं रोज यायचे. माझ्या अस्थी या पबबाहेरच विसर्जित व्हाव्यात जेणेकरून मृत्यूनंतरही मी इथल्या लोकांना भेटू शकेन. जेव्हा कधी लोक इथून जातील तेव्हा माझी आठवण जरूर काढतील, असं ते म्हणालयेच.
हे वाचा - या सेलिब्रिटीचे 2 Dogs चोरीला; जो शोधेल त्याला मिळणार तब्बल 3 कोटी
आपल्या वडिलांची शेवटची इच्छा आपण पूर्ण केली याचा आपल्याला खूप आनंद होत असल्याचंही ओवन आणि कॅसिडी म्हणाली.