जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आश्चर्य! चक्क हृदयाची धडधड बंद करून वाचवला 9 वर्षांच्या मुलाचा जीव

आश्चर्य! चक्क हृदयाची धडधड बंद करून वाचवला 9 वर्षांच्या मुलाचा जीव

आश्चर्य! चक्क हृदयाची धडधड बंद करून वाचवला 9 वर्षांच्या मुलाचा जीव

…त्याला जगवण्यासाठी चक्क हृदयच बंद पाडलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 30 जून : आपल्या हृदयाची (Heart) धडधड सुरू असणं म्हणजे आपल्यात जीव आहे. ही धडधड (Heart beat) थांबणं म्हणजे आपल्या आयुष्याचा शेवट. पण जगण्याचे संकेत देणारी हीच हृदयाची धडधड (Heart operation)  थांबवून एका 9 वर्षांच्या मुलाचा जीव वाचवण्यात आला आहे. आता हे कसं शक्य आहे (Operation done by stopping heart), असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) अलिगड (Aligarh) मध्ये राहणारा 9 वर्षांचा नवनीत. त्याच्या हृदयाच्या वॉल्वमध्ये दोष होता. त्यामुळे त्याला श्वास घ्यायाला त्रास होत होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडतच होती. कित्येक हॉस्पिटल फिरवल्यानंतर अखेर त्याला अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या (AMU) जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये (JNMC) दाखल करण्यात आलं. हे वाचा -  भयंकर! जुडो कोचने 27 वेळा आपटलं; 2 महिने कोमात, 7 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू नवनीतच्या हृदयाची सर्जरी करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हतं आणि यासाठी एक आव्हानात्मक अशी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ज्यात त्याचं हृदय आणि फुफ्फुस तब्बल एक तास बंद करावं लागणार होतं. पण नवनीतचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारलं. त्याचं हृदय आणि फुफ्फुस थांबवून त्याची सर्जरी केली. कार्डियोथोरेसिक सर्जरी विभागाचे प्रो. मुहम्मद आजम हसीन यांनी सांगितलं, आम्हाला या मुलाची सर्जरी करणं गरजेचं होतं. कारण नऊ वर्षांच्या मुलाचं वॉल्व बदलणं अशक्य होतं.  सर्जरी करताना नवनीतच्या हृदयाचं आणि फुफ्फुसाचं कार्य 60 मिनिटांसाठी रखण्यात आलं. अखेर नवनीतवरील ऑपरेशन यशस्वी झाला. जो नवनीत श्वासही घेत नव्हता. तो आता नीट श्वास घेत आहे. ज्या हृदयामुळे त्याचा एका एका श्वासासाठी संघर्ष सुरू होता. ते हृदय तासभर थांबवण्यात आलं आणि त्यामुळेच त्याला आता मोकळ श्वास घेता आला. हे वाचा -  अन्ननलिका जाळून काढली; रिमोटची बॅटरी गिळताच तासाभराने गेला चिमुकलीचा जीव डॉक्टरांनी सांगितलं,  एएमयूमध्ये अशी सर्जरी केली जात नव्हती त्यावेळी इथले लोक दिल्ली आणि एसजीपीजीआई लखनऊकडे धाव घ्यायचे. हे ऑपरेशन आव्हानात्मक होतं. असं ऑपरेशन खूप कमी सरकारी रुग्णालयात केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात