गर्भनिरोधक गोळ्यांचा दररोज वापर केल्यास याचा परिणाम आरोग्यावर होतो. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये लेवोनॉर्गेस्ट्रेल नावाचं हार्मोन वापरलेलं असतं. त्यालाच ‘मॉर्निंग आफ्टर’ पिल देखील म्हटलं जातं. प्रेग्नन्सी टाळण्यासाठी महिला या गोळ्या घेतात. यामुळे सेक्सनंतर गर्भधारणेची भीती राहत नाही. मात्र या गोळ्या घेण्याची योग्य पद्धत वापरली पाहिजे.