मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हणून त्याने चोरलं उंटाचं पिल्लू ; पुढे काय झालं तुम्हीच वाचा

गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हणून त्याने चोरलं उंटाचं पिल्लू ; पुढे काय झालं तुम्हीच वाचा

प्रेमात आंधळं होऊन लोक काहीही करायला तयार होतात पण दुबई मधल्या एका प्रेमवीरावर  गर्लफ्रेंडच्या गिफ्टपायी काय वेळ आली वाचा...

प्रेमात आंधळं होऊन लोक काहीही करायला तयार होतात पण दुबई मधल्या एका प्रेमवीरावर गर्लफ्रेंडच्या गिफ्टपायी काय वेळ आली वाचा...

प्रेमात आंधळं होऊन लोक काहीही करायला तयार होतात पण दुबई मधल्या एका प्रेमवीरावर गर्लफ्रेंडच्या गिफ्टपायी काय वेळ आली वाचा...

दुबई, 18 फेब्रुवारी: अनेकदा आपल्या गर्लफ्रेंडसाठी चोर केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. प्रेयसीसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या अशाच दुबईमधील(Dubai) एका बॉयफ्रेंडने चक्क उटांचं पिल्लू चोरल्याची घटना समोर आली आहे. आपल्या गर्लफ्रेंडला वाढदिवशी गिफ्ट देण्यासाठी त्याने चक्क उंटांचं हे पिल्लू (Baby Camel) चोरलं. महत्त्वाचं म्हणजे हे उंटाचं पिल्लू चोरून त्याने आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट दिलं देखील. पण अखेर पोलिसांनी ही चोरी पकडताच त्याचा भांडाफोड झाला.

गल्फ टुडेने याविषयी बातमी दिली आहे. या व्यक्तीच्या गर्लफ्रेंडला तिच्या वाढदिवशी गिफ्ट म्हणून उंट हवा होता. परंतु त्याच्याकडे ते घेण्याइतके पैसे नव्हते. यासाठी त्याने आपल्या जवळच्याच एका फार्ममधून उंटाची चोरी करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याने उंटाच्या पिल्लाची (Baby Camel)  चोरी करून आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट दिले. परंतु आपल्या एका उंटाच्या पिलाची चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता संशयित हाती लागला. बुर दुबई पोलिस स्टेशनचे ब्रिगेडियर जनरल अब्दुल्ला खादीम बिन सूरूर अल-उमर यांनी सांगितले की या व्यक्तीने आपल्या शेताच्या शेजारी हा नवजात उंट सापडल्याचे सांगितलं. परंतु त्याने दिलेल्या माहितीत आणि फार्मच्या प्रत्यक्ष अंतरात पोलिसांना बरेच अंतर आढळून आलं.

अवश्य वाचा -    या बँकेच्या गोंधळामुळे एका रात्रीत कॉस्मेटिक कंपनी मालामाल, ट्रान्सफर केले 3,650 कोटी रुपये!

याचबरोबर या फार्ममध्ये आणि या संशयित व्यक्तीच्या घरामध्ये बरेच अंतर आढळून आलं. यामध्ये जवळपास 3 किलोमीटरचं अंतर आढळून आलं असून या अंतरात मोठा हमरस्ता आहे.  हे उंटाचं पिल्लू हा रस्ता ओलांडून येणं शक्य नसल्याचं पोलिसांनी म्हटलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं आपण हे पिल्लू चोरल्याची कबुली दिली. दरम्यान, त्याच्याकडील हे पिल्लू मूळ मालकाला सोपवण्यात आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला या प्रकरणात अटक केली. या व्यक्तीबरोबरच त्याच्या गर्लफ्रेंडला देखील या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Camel, Dubai