मॉस्को, 05 मार्च : तरुणींना जसं सुंदर दिसण्याचं वेड असतं तसं तरुणांना वेड असतं ते बॉडीचं (body building). म्हणजे तरुणांना पिळदार शरीर, सिक्स पॅक्ज अॅब्ज हवेत, मोठमोठे बायसेप्स हवेत. यासाठी ते जीममध्ये तर जातात. पण आहार, औषधं किवा काही ना काही विचित्र प्रयोगही करतात. असाच प्रयोग करणं रशियातील एका बॉडी बिल्डरला (russian body builder) चांगलंच महागात पडलं आहे. त्याला जीवघेणी अशी समस्या उद्भवली आहे. रशियातील 24 वर्षांचा बॉडीबिल्डर किरील टेरेशीनला (russian bodybuilder kirill teleshin)आपली बॉडी बनवायची होती. यासाठी त्याने विचित्र प्रयोग करून पाहिला. त्याने चक्क आपल्या हातांवर पेट्रोलियम जेलीच इंजेक्शन घेतलं (injected petrol jelly). जे त्याला खूप महागात पडलं आहे. किरीलनं सांगितलं मी 20 वयाचा असल्यापासून आपल्या हातावर पेट्रोलियम जेलीचं इंजेक्शन घेणं सुरू केलं. याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याचा साझा विचारही मी तेव्हा केला नाही. मला संपूर्ण शरीरावर हे इंजेक्शन घ्यायचं होतं. पण सर्वात आधी माझ्या बाइसेप्सवर याचा काय परिणाम होतो तो पाहिला.
फोटो सौजन्य - Kirill Teleshin/Instagram
त्याचे बायसेप्स 24 इंचाचे झाले. किरीलने हा खतरनाक प्रयोग करून बायसेप्स तर बनवले पण त्याचा तसा काहीच फायदा झाला नाही. स्पर्धेत तो अवघ्या तीन मिनिटांतच हरला. उलट त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले. किरीलनं सांगितल्यानुसार या प्रयोगानंतर त्याच्या हातात वेदना होऊ लागल्या, त्याचे हात खराब होऊ लागले, त्याला तापही येऊ लागला. हे वाचा - महिला कोणत्या गोष्टीवर करतात सर्वाधिक चर्चा, सर्वेक्षणातून आलं समोर किरीलला यासाठी सर्जरी करावी लागली. एक सर्जरी गेल्या वर्षी झाली. त्यावेळी त्याच्या हातातून सिंथोल ऑईल आणि डेड मसल्स टिश्यूज काढण्यात आले आणि आता आणखी एक सर्जरी बाकी आहे. पण कोरोना महासाथीमुळे ही सर्जरी लवकर होणं शक्य नाही. सुदैवानं त्याने हे इंजेक्शन प्रयोग म्हणून फक्त हातावरच घेतलं. त्याला पूर्ण शरीरावर हे इंजेक्शन घ्यायचं होतं. पण हाताची अशी अवस्था झाल्यानंतर त्याने आपला हा विचार बदलला. त्याने शरीरावर इंजेक्शन घेतलं नाही. हे वाचा - प्रसूतीनंतरही पोटात वेदना; 3 महिने उपचार, 5 महिन्यांनी सर्जरी करताच डॉक्टरही शॉक आज तकच्या रिपोर्टनुसार, किरीलचे सर्जन दिमित्री मेल्नीकोव्ह यांनी सांगितलं होतं की जर त्याची सर्जरी झाली नसती तर त्याचा जीवही गेला असता. किरीननं जो प्रयोग आपल्या हातावर केला कित्येक लोक हा प्रयोग आपल्या इतर अवयवांवर करतात. हा प्रयोग खूप घातक आहे, त्यामुळे कृपया असं करू नका, असा सल्लाही दिमित्री यांनी दिला आहे.