मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Ouch! हिरोगिरी करताना नको त्या ठिकाणी लागला नेम, रस्त्यावरच कोसळला तरुण; पाहा VIDEO

Ouch! हिरोगिरी करताना नको त्या ठिकाणी लागला नेम, रस्त्यावरच कोसळला तरुण; पाहा VIDEO

स्टाईल मारणं चांगलंच महागात पडलं.

स्टाईल मारणं चांगलंच महागात पडलं.

स्टाईल मारणं चांगलंच महागात पडलं.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 05 ऑक्टोबर : इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तसा बहुतेकांचा असतो. पण एखादा हिरो किंवा एखादा आयडल असेल तर त्याच्यासारखं हुबेहूब दिसण्यासाठी किंवा त्याच्यासारखं करण्यासाठीही अनेक जण धडपडतात. हिरोसारखी स्टाइल आणि स्टंट (Stunt video) मारायला जातात पण अनेकदा ते चांगलंच महागात पडतं. असाच एक व्हिडीओ (Viral video) सध्या सोशल मीडियावर (Social media video) व्हायरल होतो आहे. एक तरुण रस्त्यातच स्टंट करायला गेला, जो त्याला खूप म्हणजे खूप भारी पडला. स्टंट करताना त्याचा नेम चुकला. खरंतर भलत्याच ठिकाणी नेम लागला आणि मग काय तरुण रस्त्यावर कोसळला आणि वेदनेने इतरा कळवळला की तिथंच त्याने लोळण घेतली. बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता फूटपाथवरून हा तरुण चालत होता. तिथं दोन खांब होते. त्यातील एका खांबावर हा तरुण उभा राहतो आणि तिथून दुसऱ्या खांबावर उडी मारायला जातो. तो उडी मारतोच तो त्याचा पाय सटकतो आणि तो घसरतो. त्याचे दोन्ही पाय दोन दिशेने जातात आणि तो खांबावर आदळतो. त्याच्या दोन पायांच्या मधोमध खांब लागतो आणि तरुण अक्षरशः उडून रस्त्यावरच कोसळतो. मध्यभागीच त्याला इतक्या जोरात मार बसल्याने तो वेदनेने व्याकूळ होतो. तिथं हात लावून तो रस्त्यावर लोळण घेतो. या कुशीवरून त्या कुशीवर फिरतो. हे वाचा - भरधाव बाईकसोबत फरफटत गेला तरुण आणि...; धडकी भरवणारा VIDEO VIRAL याआधी स्केटबोर्डचाही असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्केटबोर्डचा वापर करत उंचावरून खाली येणाऱ्या तरुणाचा बॅलन्स बिघडल्यामुळे त्याचा स्टंट खराब होतो. होल्ड माय बिअर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये एक व्यक्ती स्केटबोर्डवर स्टंट करत उंचावरून खाली येत होती. स्टंट करताना काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी ती गोल गोल फिरू लागते. मात्र, खाली येण्याच्या प्रयत्नात असतानाच तिचा बॅलन्स बिघडतो आणि हा स्टंट खराब होतो. हे वाचा - बापरे! इवल्याशा चिमुकल्याचा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अचंबित आजकाल तरुणांमध्ये स्टंटबाबत (Stunt) प्रचंड क्रेज असल्याचं पाहायला मिळतं. प्रसिद्ध मिळवण्याचा नादात तरुण अनेकदा स्वतःच्या जीवासोबतच खेळ करतात. वेगळं काहीतरी करण्याच्या नादात अनेकदा अशाही काही घटना घडतात, ज्या पाहून धक्का तर बसतोच पण हसूही आवरत नाही.
First published:

Tags: Shocking video viral, Stunt video, Viral, Viral videos

पुढील बातम्या