जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Antibody Cocktail Drug घेणाऱ्या पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट; डॉक्टरांनी सांगितलं कसं काम करतंय औषध

Antibody Cocktail Drug घेणाऱ्या पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट; डॉक्टरांनी सांगितलं कसं काम करतंय औषध

बरेच दिवस ब्लड प्लेटलेट्स कमी असतील तर, डॉक्टरकडे धाव घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टंन्ट डॉक्टर अतुल गोगिया यांच्यामते कोरोनामधूव रिकव्हर झालेल्या काही रुग्णांमध्ये ब्लड प्लेटलेट्स खुप कमी म्हणजे 10,000-20,000 असल्याचं दिसून आलं आहे.

बरेच दिवस ब्लड प्लेटलेट्स कमी असतील तर, डॉक्टरकडे धाव घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टंन्ट डॉक्टर अतुल गोगिया यांच्यामते कोरोनामधूव रिकव्हर झालेल्या काही रुग्णांमध्ये ब्लड प्लेटलेट्स खुप कमी म्हणजे 10,000-20,000 असल्याचं दिसून आलं आहे.

भारतात लाँच झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी Antibody Cocktail Drug एका रुग्णाला देण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगढ, 26 मे :  कोरोना रुग्णांसाठी भारतात लाँच झालेलं अँटिबॉडी कॉकटेल औषध (Antibody Cocktail Drug) पहिल्या कोरोना रुग्णाला देण्यात आलं आहे. हरयाणातील 84 वर्षीय रुग्णाला (Corona patient) हे औषध देण्यात आलं आहे. गुरुग्राममधील मेंदाता रुग्णालयात हा रुग्ण पाच दिवसांपासून रुग्ण उपचार घेत होता. त्यानंतर मेंदाता रुग्णायातील डॉक्टरांनी हे औषध नेमकं कसं काम करतं आहे, याचा रिपोर्ट दिला आहे. रॉशे इंडिया (Roche India) आणि सिप्लानं (Cipla) सोमवारी भारतात हे औषध लॉन्च केलं आहे. रॉशेनं या कॉकटेल औषधात कासिरिविमॅब आणि इमदेविमॅब (Casirivimab and Imdevimab) सामिल केलं आहे. अमेरिकेनंतर भारतातही याच्या आपात्कालीन वापरास परवानगी मिळाली आहे. सौम्य ते मध्यम लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना हे औषध देण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी भारतात हे औषध लाँच झालं. त्यानंतर मंगळवारी हरयाणाच्या गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमधील 84 वर्षीय रुग्णाला हे औषध दिलं गेलं. पाच दिवसांपासून हा रुग्ण उपचार घेत होता. मोहब्बत सिंह असं त्यांचं नाव आहे. हे वाचा -  राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती मेदांता रुग्णालयाचे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान यांनी एएआयशी बोलताना सांगितलं की, “या रुग्णाला इतर आजारही आहेत. आम्ही त्यांना काल हे औषध दिलं आणि  घरी पाठवलं. आम्ही त्यांचा फॉलोअप घेत आहोत” “कोरोना रुग्णाला सुरुवातीच्या टप्प्यात जर हे औषध दिलं तर ते व्हायरला रुग्णाच्या शरीरातील पेशींमध्ये जाण्यापासून रोखतं. परिणामी ज्या रुग्णांच्या शरीरात व्हारसचं प्रमाण जास्त आहे आणि ज्यांना तीव्र संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे,  त्यांच्यामध्ये व्हायरसच्या प्रतिकृती तयार होण्याचं प्रमाण कमी होतं.  B.1.617 या व्हेरिएंटवरसुद्धा हे औषध प्रभावी आहे. हे नवं शस्त्र आहे”, असं डॉ. त्रेहान यांनी सांगितलं. हे वाचा -  BMCचा मोठा निर्णय; काळ्या बुरशीवरील औषध खासगी रुग्णालयांना उपलब्ध करुन देणार सध्या भारतात अँटीबॉडी कॉकटेलचे केवळ 1,00,000 पॅक उपलब्ध आहेत. यातून तब्बल 2 लाख कोरोनाबाधितांवर उपचार करता येईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एका पॅकेटमध्ये दोन रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. याची दुसरी खेप जूनच्या मध्यापर्यंत देशात दाखल होईल. भारतात या अँटीबॉडी कॉकटेलची किंमत 59,750 इतकी आहे.  या औषधाच्या मल्टीडोसची किंमत 1,19,500 रुपये आहे. कोरोना रुग्णांना हे औषध प्रमुख रुग्णालयं आणि कोविड केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात