प्रेमात धोका मिळाल्यानंतर मुंबई, पुणेकर काय करतात? सर्वेक्षणात समोर आली बाब

प्रेमात धोका मिळाल्यानंतर मुंबई, पुणेकर काय करतात? सर्वेक्षणात समोर आली बाब

डेटिंग अ‍ॅप ग्लीडेननं (Gleeden) सर्वेक्षण केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जून : नात्याबाबत (relationship) लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अनेक जण विवाहबाह्य संबंध ठेवू लागलेत. फक्त पुरुषच नाही तर महिलांचाही विवाहबाह्यसंबंधांकडे कल वाढलेला आहे. एक्स्ट्रा मेरिटल डेटिंग अ‍ॅप ग्लीडेननं (Gleeden) भारतीयांवर नुकतंच एक सर्वेक्षण केलं. ज्यामध्ये पार्टनरने धोका दिल्यानंतर एखादी व्यक्ती काय करेल, ते जाणून घेण्यात आलं आहे.

ग्लीडेनने भारतातील 34 ते 49 वयोगटातील एक हजार व्यक्तींचं सर्वेक्षण केलं. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमधील व्यक्तींचा समावेश होता.

आजतकमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या सर्वेक्षणात 72 टक्के लोकांनी लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या ऑनलाइन डेटिंगला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर बहुतेक लोकांनी आपल्याला धोका देणाऱ्या जोडीदाराने गुन्हा केल्याचं म्हटलं आहे.  तर काही जणांनी जोडीदाराने धोका दिल्यानंतरही त्याला दुसरी संधी देण्याची तयारी दर्शवली आहे.

हे वाचा - कोरोना झाला तर 2 लाख रुपये देणार; या देशाची परदेशी पर्यटकांना ऑफर

सर्वेक्षणात दिसून आलं की,  36.9 टक्के लोकं त्यांच्या जोडीदाराने त्यांना फसवल्यानंतरही दुसरा पार्टनर शोधत नाहीत. उलट ते कोणत्याही अटींशिवायच त्याला माफ करतात आणि त्याच्यासोबतचं नातं कायम ठेवतात.  40.1 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांचं भविष्य हे धोका का दिला त्या कारणावर अवलंबून आहे तर 23 टक्के लोकांनी धोका मिळाल्यानंतर त्या नात्यातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हे वाचा - 2 वर्ष ज्या झाडाला घातलं पाणी; त्याच्याबाबत असं काही समजलं की महिलेला बसला शॉक

विशेष म्हणजे 48.1 टक्के लोकांना दोन वेगवेगळ्या व्यक्तीवर प्रेम करण्यास पसंती दिली आहे, तर  44.5 टक्के लोकं याविरोधात आहेत. लोकं आपलं नातं आणि आयुष्याबाबत पहिल्यापेक्षा अधिक व्यवहारिक झालेत. जोडीदारासह नाती टिकत नसेल तरी ते त्यातून बाहेर पडत नाहीत तर तेच नातं कायम ठेवून दुसऱ्या नात्यात आनंद शोधतात, असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 28, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading